आर्यन खान प्रकरण : मंत्री नवाब मलिक यांना देण्यात आली Y+ दर्जाची सुरक्षा

गेल्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेमुळे वेगवेगळ्या राज्यांमधून धमकीचे फोन आल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता.Aryan Khan case: Minister Nawab Malik granted Y + grade security


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मंत्री नवाब मलिक यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यापूर्वी त्यांच्या सुरक्षेसाठी पिस्तूलसह सोबत असणारा पोलीस गार्ड होता.नवाब मलिक यांना आता वाय प्लस सुरक्षा दिली जाणार आहे.

वाय प्लस सुरक्षा

वाय प्लस सुरक्षेअंतर्गत नवाब मलिक निवासस्थानी पायलट कारसह चार सशस्त्र पोलीस रक्षक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.गेल्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेमुळे वेगवेगळ्या राज्यांमधून धमकीचे फोन आल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) गेल्या आठवड्यात मुंबई किनाऱ्यावरील एका आलिशान क्रूझवर टाकलेला छापा बनावट होता, असा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता.



पुढे नवाब मलिक म्हणाले की , “भाजप गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहे.दरम्यान ३ ऑक्टोबर रोजी केलेली कारवाई ही त्या षडयंत्राचा भाग म्हणून बनावट होती,”

” एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची हेरगिरी कोण करत आहे, हे माहित नाही. मात्र जर वानखेडे यांनी नाव घेऊन मी नवाब मलिक त्यांची हेरगिरी करत आहे,” असं सांगितलं तर मी त्यांना उत्तर देईन, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

Aryan Khan case: Minister Nawab Malik granted Y + grade security

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात