महाराष्ट्रात लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा आक्रमक; राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त कायदा आणावा, या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी या प्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लोकायुक्त कायद्याबाबत राज्य सरकार चालढकल करत आहे. त्यामुळे अण्णांनी राज्यभर एक मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. Anna Hazare is Aggressive for Lokayukta Act in Maharashtra ; Warning of statewide agitation

अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे की,  देशातील भ्रष्टाचाराला कायमचा आळा घालण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. लोकशाहीमध्ये कायदा सर्वोच्च असतो.

म्हणून व्यवस्था परिवर्तनाला कायदेशीर आधार असावा यासाठी २०११ मध्ये देशात लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी देशातील जनतेने आंदोलन सुरू केले. हे आंदोलन २०१४ पर्यंत चालले. लोकपाल लोकायुक्त आंदोलनाचा देशात ऐतिहासिक परिणाम झाला.



 

करोडो रुपये खर्च करून जे लोकशिक्षण लोकजागृती झाली नसती, अशी लोकशिक्षण लोकजागृती झाली. भ्रष्टाचारा विरोधात लोक निर्भय बनले. लाखो लोक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरल्यामुळे सरकारवर जनशक्तीचा दबाव निर्माण झाला. दोन वेळा मध्यरात्री पर्यंत विशेष  संसद बसली आणि केंद्रात लोकपाल राज्यात लोकायुक्त कायदा करण्याचा ऐतिहासिक ठराव पास केला.

अखेर १ जानेवारी २०१४ रोजी केंद्रात लोकपाल कायदा मंजूर झाला. आता महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त कायदा होणे आवश्यक आहे मात्र राज्य सरकार चालढकल करी आहे, असं अण्णांनी म्हटलं आहे.

Anna Hazare is Aggressive for Lokayukta Act in Maharashtra ; Warning of statewide agitation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात