मलिक V/s शेलार : मलिकांचा भाजपवर दंगल भडकावल्याचा आरोप, आशिष शेलारांचाही जोरदार पलटवार- …तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही!

Amravati Violence Nawab Malik Allegations On BJP, Ashish Shelar Hits Back

Amravati Violence : राज्यात नुकत्याच झालेल्या हिंसाचारावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांत राजकारण पेटले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी दंगल भडकवण्याचा सुनियोजित कट भाजप नेत्यांनी रचल्याचा थेट आरोप पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांच्या मते नांदेड, मालेगाव आणि अमरावती येथे हिंसक घटना घडत असताना भाजपने बंदची हाक देत नियोजनबद्ध पद्धतीने दंगली घडवून आणल्या. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी हा कट रचला होता. तथापि, त्यांच्या या दाव्यांवर भाजप नेते आशिष शेलार यांनीही जोरदार पलटवार केला आहे. Amravati Violence Nawab Malik Allegations On BJP, Ashish Shelar Hits Back


प्रतिनिधी

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या हिंसाचारावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांत राजकारण पेटले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी दंगल भडकवण्याचा सुनियोजित कट भाजप नेत्यांनी रचल्याचा थेट आरोप पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांच्या मते नांदेड, मालेगाव आणि अमरावती येथे हिंसक घटना घडत असताना भाजपने बंदची हाक देत नियोजनबद्ध पद्धतीने दंगली घडवून आणल्या. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी हा कट रचला होता. तथापि, त्यांच्या या दाव्यांवर भाजप नेते आशिष शेलार यांनीही जोरदार पलटवार केला आहे.

नवाब मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले की, दंगल भडकवण्यासाठी पैसे वाटण्यात आले. मुंबईहून पैसे पाठवले. पण महाराष्ट्रातील जनता हुशार आहे आणि त्यांना हा खेळ कळला आहे. त्यामुळे हिंसाचाराच्या घटना महाराष्ट्राच्या इतर भागात पसरल्या नाहीत. शुक्रवारी काही मुस्लिम संघटनांनी महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागात बंदची हाक दिली होती. महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव आणि अमरावती येथे दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शनिवारी भाजपने अमरावती बंदची हाक दिली होती. या बंदच्या मागे नियोजनबद्ध पद्धतीने दंगल भडकविण्याचे काम करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात दंगल भडकवण्याचा डाव होता. त्यावर पोलिसांनी पूर्ण नियंत्रण ठेवले. महाराष्ट्रातील जनतेलाही हे कारस्थान जाणवले. त्यामुळेच अमरावतीबाहेर अशा घटना घडल्या नाहीत.

ते पुढे म्हणाले की, माजी मंत्री अनिल बोंडे आणि भाजपच्या काही नेत्यांनी 2 तारखेच्या रात्री दंगल भडकवण्याचा कट रचला. त्यासाठी काही तरुणांना पैसे वाटण्यात आले. दारूच्या बाटल्यांचे वाटप करून त्यांना अमरावती शहरात दंगल भडकावण्याचे काम सोपविण्यात आले. दगडफेक झाली, दुकाने जाळली. पोलीस तपासात सर्व बाबी समोर आल्याने आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

मलिकांनी आशिष शेलारांचा तीन-चार वर्षे जुना फोटो दाखवला

पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात गेले होते. आमच्याकडे तो फोटो उपलब्ध आहे. अशी कोणती महत्त्वाचे काम होते की भाजप नेत्याला रझा अकादमीच्या कार्यालयात जावे लागले असा सवाल त्यांनी केला आहे.

आशिष शेलारांचा पलटवार

मलिकांच्या या आरोपाला आता शेलार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जिवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन 2016 -17च्या फोटोचं संबंध काय? माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

‘तुमचे फोटो दाखवले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही!’

ते पुढे म्हणाले की, ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, असा थेट इशाराच शेलारांनी मलिकांना दिला आहे. महाविकास आघाडीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही फोटोचं राजकारण बंद करावं, असंही शेलारांनी सुनावलं.

Amravati Violence Nawab Malik Allegations On BJP, Ashish Shelar Hits Back

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात