अकोला जिल्हा परिषद निवडणूक ; प्रकाश आंबेडकरांच्या सत्तेला हादरा, दोन्ही सभापती पदांवर विरोधकांचा विजय


नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत स्फुर्ती गावंडे यांनी कुटासा गटातून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता.Akola Zilla Parishad elections; Shake the power of Prakash Ambedkar, victory of the opposition in both the posts of Speaker


विशेष प्रतिनिधी

अकोला : अकोला जिल्हा परिषदेतील निवडणूक झालेली दोन्ही सभापतीपदं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्षांच्या आघाडीला मिळाली आहे. महिला आणि बालकल्याण सभापती पदावर बच्चू कडूंच्या ‘प्रहार’च्या उमेदवार स्फूर्ती गावंडे विजयी झाल्या. त्यांनी वंचितच्या योगिता रोकडे यांचा २९ विरूद्ध २४ मतांनी पराभव केला.

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत स्फुर्ती गावंडे यांनी कुटासा गटातून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तर शिक्षण सभापती पदावर लाखपूरी गटातील अपक्ष सम्राट डोंगरदिवे बिनविरोध विजयी झालेत. त्यांच्या विरोधातील वंचितच्या उमेदवार संगिता अढाऊ यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याने डोंगरदिवे विजयी झालेत.

गेल्या वेळी मतदानावेळी गैरहजर राहत आंबेडकरांना अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या भाजपने यावेळी थेट महाविकास आघाडीला मतदान केलं आहे. अकोला जिल्हा परिषदेत भाजपचे पाच सदस्य आहेत. या निवडणुकीत वंचितच्या उमेदवार योगिता रोकडे यांचा बच्चू कडू यांच्या ‘प्रहार जनशक्ती पक्षा’च्या उमेदवार स्फुर्ती गावंडे यांनी पाच मतांनी पराभव केला.

या सभापती पदाच्या निवडणुकीत स्फुर्ती गावंडे यांना २९ मतं मिळालीत.तर वंचितच्या योगिता रोकडे यांना २४ मतं मिळालीत.१४ जागांच्या पोटनिवडणूक निकालानंतर काँग्रेसने जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकरांसोबत जाण्याचे संकेत दिले होते.



 

तसेच एक सदस्य असेलेल्या बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’चा कलही आंबेडकरांकडे जाण्याचा होता. मात्र, यावेळीही भाजप तटस्थ राहील या फाजील आत्मविश्वासानं वंचितनं ना काँग्रेसला गृहीत धरलं, ना ‘प्रहार’ला. याच अती आत्मविश्वासानं वंचितचा घात करीत त्यांच्या वाट्याला पराभव आला.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार संगिता अढाऊ यांच्या चुकलेल्या उमेदवारी अर्जावरून आता वंचित बहुजन आघाडीत मोठं घमासान होऊ शकतं. गेल्या वीस वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सत्तेत असलेल्या वंचितच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज चुकतो कसा? यावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामुळे प्रत्येकवेळी रणनितीत यशस्वी होणाऱ्या वंचितचा यावेळी रणनितीतील अती आत्मविश्वासामूळे पराभव झाला आहे.

तर महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचितचा २९ विरूद्ध २४ मतांनी पराभव झाला. अकोला जिल्हा परिषदेच्या दोन सभापती पदाची निवडणूक पार पडली. यात ‘महाविकास आघाडी’ने भाजपच्या मदतीने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषदेतील सत्तेला चांगलाच हादरा दिला आहे.

Akola Zilla Parishad elections; Shake the power of Prakash Ambedkar, victory of the opposition in both the posts of Speaker

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात