रजनीकांत यांची शस्त्रक्रिया यशस्वी , थोड्याच दिवसात मिळेल डिस्चार्ज


शुक्रवारी ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि रजनीकांतची प्रकृती बरी आहे.Rajinikanth’s surgery is successful, he will be discharged in a few days


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांनी शुक्रवारी कॅरोटीड आर्टरी रिव्हॅस्क्युलायझेशन प्रक्रिया पार पाडली आणि काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, असे चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले आहे.

शुक्रवारी ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि रजनीकांतची प्रकृती बरी आहे. “त्यांना काही दिवसांनी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे,” असे म्हटले आहे. गुरुवारी , रजनीकांत यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की, त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.



रुग्णालया बाहेर पोलीस बंदोबस्त

अभिनेता रजनीकांत दाखल असलेल्या रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. रजनीकांतच्या चाहत्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यापासून किंवा गर्दी रोखण्यासाठी सुमारे ३० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत .

तैनात करण्यात आलेल्या पोलीसांमध्ये तामिळनाडूचे विशेष पोलिसांच्या दोन तुकड्यांचा समावेश असून प्रत्येकी तुकडीत १० जण आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, परिस्थिती नियंत्रणात राहण्यासीठी हा पोलीस बंदोबस्त रुग्णालयाच्या समोर तैनात करण्यात आलाय.

Rajinikanth’s surgery is successful, he will be discharged in a few days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात