दारू पिल्यानंतर झालेल्या वादात शिवीगाळ केल्याने मित्राकडून मित्राचा खून


बावधन येथील एका नाल्यामध्ये पोत्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चार दिवसात पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून चौघांना अटक केली आहे


विशेष प्रतिनिधी

पुणे – बावधन येथील एका नाल्यामध्ये पोत्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चार दिवसात पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून चौघांना अटक केली आहे. दारू पिल्यानंतर झालेल्या वादात शिवीगाळ केल्याने झालेल्या वादातून मित्रांनी हा खून केल्याचे समोर आले आहे.After drinking the alcohol frineds clashesh and one frined murder by other friends

सुनील मुना चौहान (वय २६, रा बावधन, पुणे. मुळ राज्य बिहार), मुन्ना फुनी चौहान (वय ४०), योगेन्द्र श्रीगुल्ले राम (वय ४०, मुळ रा. उत्तर प्रदेश), बलिंदर श्रीगुल्ले राम (वय ३६, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राजु दिनानाथ महातो (वय ३६, रा. कोलकत्ता सध्या रा बावधान, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.



कोणीतरी अज्ञात कारणास्तव व्यक्तीचा खून करून, त्याचे हातपाय बांधुन, त्यास पांढया रंगाचे दोन पोत्यात गुंडाळुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने बावधन येथील नाल्यामध्ये टाकून दिल्याचा प्रकार १७ एप्रिल रोजी उघडकीस आला होता. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी मयत बॉडी पडलेले ठिकाणापासून जवळपास चारही दिशांना सीसीटीव्ही कॅमेरे कोठे बसविण्यात आले आहेत हे पाहणेकरीता वेगवेगळ्या टिम करून चारही दिशांना रवाना केल्या.

घटनास्थळाच्या जवळील सलग दोन दिवस रात्री सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना मयत बॉडी मिळण्याच्या पाच दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस हायवेचे बाजूचे सव्हिस रोडने दोन दु-व्हिलर घटनास्थळावर येवून काही तरी संशयास्पद हलचाली करताना दिसून आले. त्यानंतर घटनास्थळाचे आजुबाजुस असणारे

१०० पेक्षा अधिक सीसीटीव्हीचे फुटेज तपासलेनंतर एका अॅक्टीव्हा दुचाकीवर दोन इसम त्यांचे मध्ये पांढऱ्या रंगाचे पोत्यामध्ये काहीतरी घेवून जात असताना दिसुन आलेने त्या अॅक्टीव्हा गाडी बाबात माहिती घेतली असता ती गाडी बावधन येथील डी पॅलेस हॉटेल जवळ असणाऱ्या चाळीत राहणाऱ्या इसमांची असल्याची माहिती पोलिसांनी काढली. त्यांनतर चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हा खून चौघांनी केला असल्याचे कबूल केले.

मयत इसम हा आरोपींबरोबरच बिगारी काम करायचा व सोबत राहत होता. मयत इसमाचे व आरोपी सुनील मुना चौहान यांच्यात झालेल्या वादावादीमुळे त्याने मयत इसम राजु महातो याचा हाताने गळा दाबुन तो बेशुध्द झालेनंतर इतर इसमानी त्याचे हात व पाय बांधून त्यास मोकळया पांढया रंगाच्या दोन गोण्यांमध्ये भरुन, दुचाकीवरुन बावधन पुणे येथील मुंबई बेंगलोर हायवे लगत असणाऱ्या नाल्याचे जवळ घेवून जावुन,

नाल्याच्या पाण्यात कोणाला दिसू नये अशा पध्दतीने टाकून दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, आरोपींना २५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी दिली.

After drinking the alcohol frineds clashesh and one frined murder by other friends

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात