Asia’s Richest Business Man : उद्योगपती गौतम अदानी बनणार आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; मुकेश अंबानी पडणार मागे


वृत्तसंस्था

मुंबई :  भारताचे उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी लवकरच संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानींना मागे टाकून आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनणार आहेत. According to the Bloomberg Billionaire Index Goutam Adani Will be Asia’s richest BusinessMan

जगभरात कोरोनामुळे मंदी आणि भारताची अर्थव्यवस्था ढासळत असताना भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत मात्र, अनेक पटींनी वाढ होत आहे. अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अशीच वाढ कायम राहिल्यास ते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतात.



ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या मते, बुधवारपर्यंत 68.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या यादीत 15 व्या क्रमांकावर आहेत. आशियातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी 75.8 अब्ज डॉलर्सच्या वैयक्तिक संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आहेत.

अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी गेल्या आठवड्यात चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकले आहे. ते आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले असून जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 15 व्या स्थानी आले आहेत. अदानी यांच्या संपत्तीत 34.76 बिलियन डॉलरची वाढ झाली. त्यांच्यापुढे मुकेश अंबानी असून त्यांची संपत्ती ही 75.8  बिलियन डॉलर आहे. चीनच्या शानशान यांची संपत्ती 63.6 बिलियन डॉलर आहे.  अदानी यांच्या संपत्तीचा वाढता दर पाहता लवकरच ते अंबानी यांना मागे टाकतील, असे सांगण्यात येत आहे.

According to the Bloomberg Billionaire Index Goutam Adani Will be Asia’s richest BusinessMan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात