आठ लाखांचे पेट्रोल जाळून 18 हजार रुपयात विमानाने दुबईला सोडले


 बडे उद्योगपती, सेलिब्रीटी, नेते यांची स्वतःची चार्टर्ड प्लेन असतात. त्यामुळे खासगी विमान प्रवास त्यांच्यासाठी नवा नसतो. परंतु, अवघ्या एका सामान्य प्रवाशासाठी चक्क बोईंग विमानाने उड्डाण करण्याची घटना नुकतीच घडली. फक्त एका प्रवाशाला घेऊन मुंबई ते दुबई असा प्रवास एमिरेट्स एअरलाईन्सच्या विमानाने केला त्याची ही अनोखी कहाणी. A man who paid only 18K to travel from Mumbai to Dubai, Got a chance of Solo flight trip on Emirates Boeing 777


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एमिरेट्स कंपनीचे मुंबईहून दुबईला जाणारे बोईंग विमान उड्डाणासाठी तयार होते. या विमानाची क्षमता साडेतीनशे प्रवासी वाहून नेण्याची. प्रत्यक्षात फक्त एका प्रवाशाला घेऊन हे विमान उडाले. होय,

अवघ्या एका प्रवाशासाठी मुंबई ते दुबई हे अडीच तासाचे अंतर एमिरेट्सच्या विमानाने कापले. या प्रवासाच्या तिकीटाची किंमत होती 18 हजार रुपये आणि हे अंतर कापण्यासाठी विमानाला पेट्रोल लागले आठ लाख रुपयांचे.



कोरोना काळामुळे हा दुर्मिळ प्रसंग घडला. भावेश झवेरी हा तो भाग्यवान प्रवासी ठरला. चाळीस वर्षांच्या भावेश यांनी या प्रवासाचा पुरता आनंद लुटला हे वेगळे सांगायलाच नको. गंमत म्हणजे भावेश यांनी सांगितले की, विमानाने उड्डाण केल्यानंतर मी संपूर्ण विमानात फिरण्याचे ठरवले होते.

प्रत्यक्षात विमान उडाले आणि दमल्यामुळे मी झोपून गेलो. विमान दुबईत उतरले तेव्हाच मला जाग आली. विमानातून उतरताना भावेश यांनी पायलट आणि क्रू मेंबरचे आभार मानले. पैसे देऊनही विकत घेता येणार नाही, असा हा अनुभव असल्याची प्रतिक्रीया भावेश यांनी व्यक्त केली.

संयुक्त अरब अमिरातीने (युएई) भारतीय प्रवाशांच्या प्रवेशावर 14 जूनपर्यंत बंदी घातली आहे. केवळ युएईचे नागरीक, गोल्डन व्हिसाधारक आणि राजदुतावासाशी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनाच यातून सूट देण्यात आली आहे.

त्यामुळे एरवी दुबईला फुल्ल भरुन जाणारी विमाने सध्या जवळपास रिकामी आहेत. पण संपूर्ण विमानात एकच प्रवासी असाही योग जुळून आला.एमिरेट्स एअरलाईन्स कंपनीला एकाच प्रवाशाने बुकिंग केल्याने चिंता होती.

कारण बोईंग 777 हे साडेतीनशे प्रवाशांना घेऊन उडणारे विमान मुंबईतून दुबईत येणार होते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत प्रवासी वाढण्याची अपेक्षा एमिरेट्सला होती. पण तसे घडले नाही.

भावेश झवेरी यांच्याकडे गोल्डन व्हिसा असल्याने त्यांचेही तिकीट नाकारण्याची शक्यता नव्हती. अखेरीस एमिरेट्सने एकट्या भावेश यांना घेऊन दुबईच्या दिशेने उड्डाण केले.

या प्रवासादरम्यान भावेश यांना उत्कृष्ट सेवा देण्यात विमानाच्या क्रू मेंबर्सनी कोणतीही कसर सोडली नाही. भावेश यांच्या स्वागतासाठी विमानाच्या पायलटपासून सर्व क्रू मेंबर विमानाच्या दरवाजात उभे होते. स्वतः भावेश यांनाही या लाईफटाईम संधीचे प्रचंड कौतूक वाटले.

त्यांनी आपल्या संस्मरणीय प्रवासाचे चित्रण आपल्या मोबाईलमध्ये केले. विमानात एकटे भावेश असले तरी कुर्सी की पेटी बांध लिजिए, लँडींग के लिए तैय्यार हो जायीए वगैरे सूचनाही त्यांना नेहमीप्रमाणेच दिल्या गेल्या.

भावेश हे हिरे व्यापारी असून एका कंपनीचे सीईओ आहेत. युएईचे नागरिकत्त्व असल्याने त्यांच्याकडे गोल्डन व्हिसा आहे. या अनोख्या हवाई सफरीबद्दल भावेश यांनी सांगितले की, मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर लगेचच माझ्या लक्षात आले की विमानात बहुधा मी एकटाच असणार आहे.

मी खूपच उत्साहीत झालो. मी छोटा व्हिडीओ करुन माझ्या फेसबुक, इन्स्टा अकाऊंटवर शेअर करण्याचे ठरवले. तेथून तो व्हॉट्स अँपवरही आला आणि अचानकपणे मी सेलिब्रिटी झालो.

A man who paid only 18K to travel from Mumbai to Dubai, Got a chance of Solo flight trip on Emirates Boeing 777

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात