कोरोनाची चाचणीशिवायच विमानप्रवास; देशांतर्गत १६१९ तर परदेशी ८११ बाधित


वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनाची चाचणी शिवाय विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा तब्बल 1,619 जणांनी चाचणी न करताच प्रवास केल्याचे उघड झाले आहे. हे सर्व देशांतर्गत प्रवासी होते. 811 आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी चाचणी केली नसल्याचे स्पष्ट झाले. Many National and International Passengers are not doing corona test while Traveling Through Aeroplane

आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमानप्रवासासाठी कोरोना चाचणी बंधनकारक आहे. त्याला बगल देऊन लक्षणे असतानाही अनेक जण विमान प्रवास करत आहेत. चार महिन्यात अडीच हजार प्रवासी बाधित असल्याचे आढळले आहे.आखाती देश, युरोप, ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्याचा नियम डिसेंबर 2020 मध्ये करण्यात आला. त्यांना 72 तास आधी अहवाल नकारात्मक आल्यानंतरच प्रवासाची मुभा आहे. याशिवाय दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवातूनही येणाऱ्यांनाही चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक केले आहे.

रुग्णांची वाढती संख्या पाहाता जानेवारी २०२१ नंतर विमान प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध लागू झाले. त्यानंतर मुंबईत आल्यानंतरच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी झाली.

जानेवारी ते एप्रिल 2021 दरम्यान मुंबई विमानतळावर 2 लाख 63 हजार 509 प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात देशांतर्गत 1 लाख 79 हजार 696 प्रवाशांच्या, तर 83 हजार 813 आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचण्यांचा समावेश होता.

चाचण्या केल्यानंतर 1 हजार 619 देशांतर्गत प्रवासी बाधित आढळले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये बाधितांची संख्या 811 एवढी आहे. मार्चमध्ये मुंबई विमानतळावर केलेल्या चाचणीत देशांतर्गत 531 प्रवाशांना व 302 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना करोनाची लागण झाली होती. दरम्यान, विमान प्रवाशांनी नियम पाळावेत, असे आवाहन केले आहे, अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

Many National and International Passengers are not doing corona test while Traveling Through Aeroplane

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती