वृत्तसंस्था
मुंबई : येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरु झालाच पाहिजे, अशी मागणी राज्यातील व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. Business men Urges CM to start trade from 1 June
राज्यातील लॉकडाऊनमुळे दुकाने, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मोठं नुकसान होत आहे. तरी कृपया लॉकडाऊन हटवा,अशी मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली.
महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांत सर्व व्यापार सुरू आहेत. पण, व्यापार बंद राहिल्यास व्यापारी शेजारील राज्यात जाण्याची भीती आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही.
त्यामुळे आता 1 जून नंतर कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच अशी व्यापार्यांची आग्रही भूमिका असल्याने सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही ललित गांधी केली. या बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सिताराम कुंटे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही पाठवण्यात आल्या असुन सरकाने त्वरित निर्णय जाहीर करण्याची मागणीही केली आहे.
निवेदनातील मागण्या
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App