Corona Updates: डिस्चार्जपेक्षा नवीन कोरोना रुग्ण अधिक, राज्यातील चित्र ; मृत्यूचे प्रमाण शून्यावर


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात बुधवारी घरी बरे होऊन गेलेल्यांपेक्षा नवीन कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दुसरीकडे काही राज्यात मृत्यूचे प्रमाण शून्यावर आल्याने दिलासा मिळाला आहे.Corona Updates : In maharashtra More new corona patients than discharge,

बुधवारी 24,752 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 23,065 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. 453 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन आकडेवारीत रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे.  राज्यात एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.



 

Recovery Rate 92.76% टक्के

आजपर्यंत एकूण 52,41,833 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे Recovery Rate 92.76% टक्के आहे. राज्यात बुधवारी 453 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.62 टक्के आहे.

3,38,24,959 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,50,907 (16.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या 23,70,326 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर 19,943 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

येथे एकही मृत्यू नाही

गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, धुळे जिल्हा, लातूर शहर, परभणी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भायंदर, कल्याण डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे शहर या ठिकाणी एकाही मृत्यूची नोंद नाही.

तर नवी मुंबई, वसई विरार, मालेगाव, अमरावती परिसरात आणि औरंगाबाद, पालघर, चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तिच मृत्यू झाल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आली आहे.

Corona Updates : In maharashtra More new corona patients than discharge,

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात