हुश्शऽऽऽ! टोल प्लाझावरुन अवघ्या दहा सेकंदात सुटका, जाणून घ्या NHAIची नवीन नियमावली


Wow! Get rid of the toll plaza in just ten seconds, learn the new rules of NHAI


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पोल प्लाझा वर असणार्या लांबच लांब रांगा पाहिल्या की प्रवास नकोसा होतो .आता या त्रासातून सुटका होणार आहे .अवघ्या 10 सेकंदात टोल प्लाझावरुन सुटका आणि 100 मीटर पेक्षा जास्त रांग नाही अशी खात्रीने जलद प्रवासाची हमी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण देणार आहे.  तशा गाईडलाईन्सच प्राधिकरणातर्फे काढण्यात आल्या आहेत. तसंच पुढच्या दहा वर्षांचा विचार करून टोल प्लाझांमध्ये बदलही करण्यात येणार आहेत.Wow! Get rid of the toll plaza in just ten seconds, learn the new rules of NHAI

जरी बहुतांश टोल प्लाझावर फास्टॅग (FASTag) 100 टक्के अनिवार्य केल्यावर प्रतीक्षा कालावधी नसला तरीही काही कारणास्तव 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांगा असल्यास टोल बूथपासून 100 मीटरच्या आत रांग येईपर्यंत वाहनांना टोल न भरताच पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.

या उद्देशाने टोल बूथपासून 100 मीटर अंतरावर पिवळ्या रेषा प्रत्येक टोल मार्गिकेत चिन्हांकित केल्या जातील. टोल प्लाझा चालकांमध्ये याद्वारे त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल.

टोल प्लाझा वर वाहनांना कमीत कमी वेळ थांबावं लागावं यासाठी नवीन गाईडलाईन्स भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे काढण्यात आले आहेत. ज्यानुसार 100 टक्के वाहनांना फास्ट टॅग लागल्यानंतर या टोल प्लाझावर 10 सेकेंदा पेक्षा जास्त वाहनांना थांबवता येणार नाही आणि 100 मीटर लांब रांग टोल प्लाझावर दिसू नये यासाठी नियम करण्यात आला आहे. गर्दीच्यावेळी विनाअडथळा प्रवास व्हावा या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जर, एखाद्या टोल प्लाझावर 100 मीटरपेक्षा जास्त लांब रांग असेल तर रांगेची लांबी 100 मीटरपर्यंतच राहील याची काळजी घेण्यात येणार आहे.

प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार नॅशनल हायवेवर 96 टक्के गाड्यांना फास्ट टॅग लावण्यात आलं आहे तर काही टोल प्लाझावर हे प्रमाण 99 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

पिवळी लाईन

प्रत्येक टोल प्लाझावर 100 मीटर लांब रांग ओळखण्यासाठी पिवळी पट्टी लावण्यात येणार आहे. जेणेकरुन टोल ऑपरेटरला जबाबदार धरणं सोपं जाणार आहे.

सोशल डिस्टन्सिंग

सोशल डिस्टन्सिंग हा नवीन नियम झाल्याने चालक आणि टोल ऑपरेट यांच्यात येणारा मानवी संपर्क टाळण्यासाठी प्रवासी टोल भरताना फास्ट टॅगसाठी आग्रही आहेत. अशी माहितीही प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल जमा करणं वाढत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमध्ये बदल करण्यात येणार आहे. पुढच्या 10 वर्षांचा विचार करून आधुनिक पद्धतीने या टोलची रचना आणि बांधणी करण्यात येणार आहे.

Wow! Get rid of the toll plaza in just ten seconds, learn the new rules of NHAI

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात