तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्या सुटकेला आव्हान, महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप


तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून गोव्याच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. मात्र, आता गोवा सरकारने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. गोवा सरकारला या प्रकरणी जवळपास 500 पानांची हार्ड कॉपी मिळाली. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर या निर्णयाला आव्हान दिले आहे. Challenging the release of former Tehelka editor Tarun Tejpal, accused of sexually abusing a woman


विशेष प्रतिनिधी

पणजी : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून गोव्याच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. मात्र, आता गोवा सरकारने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. गोवा सरकारला या प्रकरणी जवळपास 500 पानांची हार्ड कॉपी मिळाली. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर या निर्णयाला आव्हान दिले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गोवा सरकार न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात दाद मागेल. आम्ही गोव्यात महिलांविरोधात कोणताही अन्याय सहन करणार नाही. आम्ही जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला लवकरच उच्च न्यायालयात आव्हान देऊ.ह्व सावंत यांनी स्वत: या प्रकरणात व्यक्तिगत लक्ष घालून उच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत निर्देश दिले. आपल्याकडे आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचा दावा सावंत यांनी केलाय.

गोवा पोलिसांनी नोव्हेंबर 2013 मध्ये तरुण तेजपालविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तेजपाल यांना अटक करण्यात आली होती. . गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने तेजपालविरुद्ध जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. त्यानंतर मे 2014 मध्ये तेजपाल यांना जामीन मंजूर झाला. 1 जुलै 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने तेजपाल यांना जामीन मंजूर केला होता. त्यावेळी न्यायालयाने म्हटलं होतं, आरोपीने 30 नोव्हेंबर 2013 रोजी अटकेनंतर 6 महिने तुरुंगवास भोगलाय. 17 फेब्रुवारीला आरोपीविरुद्ध आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलंय. त्यामुळे आरोपीला तुरुंगात ठेवण्याची गरज नाही.



या आरोपपत्राला आरोपी तेजपालने उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र, उच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर 2017 रोजी आरोपपत्र दाखल करण्यास स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर 28 सप्टेंबर 2017 रोजी जिल्हा न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालं. यात तेजपालवर अपहरण करणं आणि बलात्कार करण्याचे आरोप होते. सर्वोच्च न्यायालयाने गोवा न्यायालयाला 6 डिसेंबर 2017 रोजी या प्रकरणी सुनावणी सुरु करण्याचे आदेश दिले. यानंतर 7 डिसेंबर 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोवा उच्च न्यायालयाला या प्रकरणी साक्षी नोंदवण्यास सांगितलं.

Challenging the release of former Tehelka editor Tarun Tejpal, accused of sexually abusing a woman

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात