गणेशोत्सवासाठी कोकणात मुंबईतून एसटीच्या २२०० गाड्या; चाकरमान्यांना खूश करण्याचा ठाकरे – पवार सरकारचा प्रयत्न


वृत्तसंस्था

मुंबई – कोकणातील अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 हजार 200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमधील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे. 2200 ST buses of for passengers going to Konkan for Ganpati Utsav

मुंबईतून निघणाऱ्या या एसटी गाड्या थेट चाकरमान्यांना थेट त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडणार आहेत. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलै २०२१ पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती आणि कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

2200 ST buses of for passengers going to Konkan for Ganpati Utsav

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात