वांद्रेमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक, 19 मेपर्यंत कोठडी

20 Year Old Gang Raped In Bandra bandstand Sea Shore, Three Arrested by Bandra Police Mumbai

Bandra bandstand : वांद्रे पश्चिममधील प्रसिद्ध बँडस्टँड परिसरात एका वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या घटनेतील पीडित तरुणी व आरोपींची पूर्वीपासून ओळख होती. 20 Year Old Gang Raped In Bandra bandstand Sea Shore, Three Arrested by Bandra Police Mumbai


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वांद्रे पश्चिममधील प्रसिद्ध बँडस्टँड परिसरात एका वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या घटनेतील पीडित तरुणी व आरोपींची पूर्वीपासून ओळख होती. 11 मे रोजी रात्री दोन बाईकवरून हे चौघेही बँडस्टँडजवळील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. तेथे गेल्यावर आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. पीडिता व आरोपी हे मानखुर्दमधील रहिवासी आहेत. हे सर्वजण 20 ते 23 वर्षे वयोगटातील आहेत.

यानंतर घरी गेल्यावर पीडितेच्या ओटीपोटात दुखू लागल्याचं तिनं सांगितले. बहिणीने विश्वासात घेऊन विचारल्यावर पीडितेने सामूहिक बलात्काराची माहिती दिली. यानंतर बहिणीच्याच पुढाकाराने पीडितेने वांद्रे पोलिसांत तक्रार दिली.

वांदे पोलिसांनी तत्काळ अॅक्शन घेत सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना 19 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

20 Year Old Gang Raped In Bandra bandstand Sea Shore, Three Arrested by Bandra Police Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण