राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो नावाचा नवा व्हायरस, कोरोनातून बरे झाल्यावर पुन्हा तब्येत बिघडली


काँग्रेसचे राज्यसभेचा खासदार राजीव सातव शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळून आला असून, हा व्हायरसही नवीन प्रकारचा व्हायरस आहे. सातव हे कोरोनातनू बरे झाल्यावर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.A new virus called cytomegalovirus in Rajiv Satav’s body returned to normal after recovering from corona


विशेष प्रतिनिधी

पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचा खासदार राजीव सातव शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळून आला असून, हा व्हायरसही नवीन प्रकारचा व्हायरस आहे. सातव हे कोरोनातनू बरे झाल्यावर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. लवकरच ते पुण्यात येणार आहेत. टोपे म्हणाले, म्हणाले, राजीव सातव यांची प्रकृती थोडी नाजूक आहे. डॉक्टर शथीर्चे प्रयत्न करत आहेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत.



राजीव सातव बरे होत असताना त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो हा नवा व्हायरस सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असून इन्फेक्शनही झालं आहे. त्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक आहे. पण डॉक्टर पूर्णत: प्रयत्न करत आहेत, काळजी घेत आहेत.

सर्वकाही उपचार केले जात आहेत. मुंबई-पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सातव यांच्यावर उपचार सुरु आहेत. मी स्वत: उद्या त्यांना भेटण्यासाठी जात आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर आहेत. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

A new virus called cytomegalovirus in Rajiv Satav’s body returned to normal after recovering from corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात