दलित लेखकाने सरस्वती सन्मान का स्वीकारावा? डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या लेखातून दिले उत्तर

Why should a Dalit writer accept Saraswati honor? Dr Sharankumar Limbale answered in his article

Dr. Sharankumar Limbale : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना देशातील अतिशय प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ जाहीर झाला. या पुरस्कारानंतर दलित लेखकाने हिंदू देवता सरस्वतीच्या नावाने असलेला पुरस्कार का स्वीकारावा, असे निषेधाचे सूर उमटू लागले. यावर खुद्द डॉ. लिंबाळे यांनी आपल्या लेखाद्वारे उत्तर देऊन टीकाकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा हा लेख ‘दैनिक लोकसत्ता‘च्या रविवार पुरवणीमध्ये प्रकाशित झाला आहे. Why should a Dalit writer accept Saraswati honor? Dr Sharankumar Limbale answered in his article


 

मुंबई : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना देशातील अतिशय प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ जाहीर झाला. या पुरस्कारानंतर दलित लेखकाने हिंदू देवता सरस्वतीच्या नावाने असलेला पुरस्कार का स्वीकारावा, असे निषेधाचे सूर उमटू लागले. यावर खुद्द डॉ. लिंबाळे यांनी आपल्या लेखाद्वारे उत्तर देऊन टीकाकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा हा लेख ‘दैनिक लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीमध्ये प्रकाशित झाला आहे.

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या लेखात मांडलेल्या भूमिकेतून एकात्म, समरस समाजव्यवस्थेचा गौरव झाला आहे. डॉ. लिंबाळे लिहितात की, केके बिर्ला फाउंडेशनचा मला पुरस्कारासाठी फोन आला तेव्हा मी त्यांना म्हणालो की, सरस्वती सन्मानामुळे दलित साहित्याला मोठी प्रतिष्ठा मिळेल. दलितांचे प्रश्न चर्चिले जाऊन ते सुटण्यास मदत होईल. यावर त्यांना आम्ही तुमची जात पाहिली नाही. तुम्ही कोणत्या विचारांचे आहात हेही पाहिले नाही, तर एका महान लेखकाच्या श्रेष्ठ कलाकृतीला आम्ही पुरस्कार दिल्याचं सांगण्यात आलं.

यावर डॉ. लिंबाळे म्हणतात की, याचा अर्थ दलितांच्या हातूनसुद्धा श्रेष्ठ कलाकृती निर्माण होते. अजिंठा, वेरूळ असेल, मंदिरे असतील किंवा मशिदी असतील त्या इथल्या दलितांनी, मजुरांनीच बांधलेल्या आहेत.

आपल्यावर झालेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी टीकाकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजनही घातलंय. डॉ. लिंबाळे लिहितात, संपूर्ण भारतात आणि मराठीमध्ये माझ्या पुरस्काराचे स्वागत होत असताना एक-दोन निषेधाचे सूरही उमटले. ‘दलित लेखकाने सरस्वती सन्मान का स्वीकारावा?’ असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्याने मी व्यथित झालो आहे. या सन्मानाचे नाव काय ठेवावे, हा के. के. बिर्ला फाउंडेशनचा विषय आहे. व्यासपीठावर सरस्वतीची प्रतिमा ठेवल्यामुळे यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारल्याची चर्चा झाली. तीच भावना माझ्या पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा व्यक्त झाली. आमच्या नातेवाईकांमध्ये दोन महिलांची नावे ‘सरस्वती’ आहेत. त्यांना कुटुंबातून काढून टाकायचे का? असे कसे करता येईल? गंगाधर (पानतावणे), वामन (निंबाळकर), केशव (मेश्राम) ही सर्व हिंदू देवतांची नावे आहेत. म्हणून आपण त्यांची नावे काढून टाकली का? आपण एका मिश्र संस्कृती असलेल्या समाजव्यवस्थेमध्ये राहतो. काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. किती नकार द्यायचा? नकार केवळ संत म्हणून देऊन नका. खळबळजनक प्रसिद्धी मिळावी म्हणून देऊ नका. त्यामुळे नकारात्मक वातावरण निर्माण होते.

एकात्म भूमिकेवर प्रकाश टाकताना डॉ. लिंबाळे लिहितात की, आपण एकमेकांमध्ये मिसळून मने जोडली पाहिजेत. अशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे. ‘आम्ही वेगळे आहोत, वेगळेच राहणार आणि वेगळी भूमिका घेणार..’ हे आता फार झाले. बाबासाहेबांनंतर ७० वर्षे आम्ही हीच भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही वेगळे पडू आणि समाजापासून वेगळे राहून दुर्लक्षिले जाऊ असे वातावरण निर्माण होण्याची भीती मला वाटते.

समाजाबरोबर राहायचे असेल तर विधायक भूमिका घेतली पाहिजे. इतकी मोठी हिंदू लोकसंख्या नाकारून चालणार नाही. काही हिंदू जातीयवादी असतीलही; पण आता हिंदू समाजामध्ये प्रचंड बदल झाला आहे. नवीन पिढी लढत आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखवायला नको. पुरस्कार मिळत नाहीत तेव्हा मिळत नाहीत म्हणून तक्रार करायची. मिळतात तेव्हा नाकारायला लागतो. हा कुठेतरी एकलकोंडेपणातून आलेला आक्रमकपणा आहे. तो आपल्याला पुढे घेऊन जाणार नाही. एखाद्या महाविद्यालयाचे नाव सरस्वती असेल तर तेथील ग्रंथालयात आपण पुस्तके ठेवू देणार नाही का?

टीप : डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा मूळ लेख दैनिक लोकसत्तामध्ये छापून आला आहे. येथे फक्त त्यांच्या विचारांची माहिती देण्यासाठी काही मजकूर वापरला आहे. मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

साभार. दै. लोकसत्ता

Why should a Dalit writer accept Saraswati honor? Dr Sharankumar Limbale answered in his article

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात