Corruption culminates in Mamata's rule, reveals Kailash Vijayvargiya

‘भाईपो’च्या करामती: ममतांचा भाचा अभिषेक यांनी कोळसा माफिया, गाईंचे तस्कर यांच्याकडून लुटले ९०० कोटी! विजयवर्गीय यांचा आरोप

Kailash Vijayvargiya : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगाल निवडणुकीचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात झालेल्या भ्रष्टाचारावरून त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरून ममता आणि त्यांच्या भाच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची जंत्रीच सादर केली आहे. Corruption culminates in Mamata’s rule, reveals Kailash Vijayvargiya


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगाल निवडणुकीचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात झालेल्या भ्रष्टाचारावरून त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरून ममता आणि त्यांच्या भाच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची जंत्रीच सादर केली आहे.

विजयवर्गीय यांनी ट्वीटमध्ये लिहिलेय की, “पीसी आणि भाइपो’ची करामत!!! ज्यांना पश्चिम बंगालमध्ये ममता राजदरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी काय काळं-पांढरं केलंय हे जाणून घ्यायचं असेल त्यांनी हे वाचा.. हा तर फक्त एक इशारा आहे. अजून बऱ्याच गोष्टी समोर यायच्या बाकी आहेत. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर तेही समोर येईल. असोल पोरीबर्तन होऊनच राहणार.”

आपल्या ट्वीटसोबत त्यांनी ममता आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील आरोपांची यादी जोडली आहे. ममतांचा पुतण्याच्या एका निकटवर्तीयाने हे खळबळजनक खुलासे केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काय आहेत आरोप…

 • ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक यांनी कोळसा माफिया, गायींचे तस्कर यांच्याकडून 900 कोटींहून जास्त रक्कम घेतली.
 • अनुप माजी ऊर्फ लाला नावाच्या तस्कराला बंगाल लुटण्याचा पूर्ण ठेका दिला.
 • अभिषेक बॅनर्जी यांचे खासमखास विनय मिश्रा, विकास मिश्रा आणि अशोक मिश्रा हे सर्वांकडून वसुली करायचे.
 • अभिषेक बॅनर्जी यांनी विनय मिश्रा यांना तृणमूलच्या युवा संघटनेचे प्रमुख बनवले होते. ते सध्या फरार आहेत.
 • या 900 कोटी रुपयांच्या बदल्यात या माफियांना पूर्ण सरकारी संरक्षण देण्यात आले.
 • बंगालमध्ये शिक्षकांच्या भरतीदरम्यान कोट्यवधी कमावले. भरती करण्यासाठी प्रत्येकी 5 लाख घेण्यात आले.
 • बंगालमध्ये माफिया आणि तस्कर हे ममतांच्या भाच्या दरमहिन्याला 40 कोटी रुपये द्यायचे.
 • भाच्याचा हा लुटीचा खेळ ममता दीदी धृतराष्ट्र बनून पाहत राहिल्या.
 • अनुप मांझी ऊर्फ लाला याच्या जवळचा व्यावसायिक गणेश बागडियाने हा खळबळजनक खुलासा केलाय.
 • अभिषेक अत्यंत खतरनाक आहे, विशेषकरून जे त्यांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी. अशा व्यक्तींना धडा शिकवण्यासाठी ते कोणतीही हद्द पार करू शकतात.
 • अभिषेक यांच्या एका इशाऱ्यावरून त्यांची माणसं कुणाचंही घर जाळू शकतात. कोणत्याही दुकाना/फॅक्ट्रीला लुटू शकतात. बनावट हत्यार, बनावट नोटांच्या अनेक केसेस, अनेक तक्रारींनंतरही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही.
 • विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी सामान्य बाब आहे.

Corruption culminates in Mamata’s rule, reveals Kailash Vijayvargiya

महत्त्वाच्या बातम्या

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*