राष्ट्रवादीचे पदाधिकारी चिरीमिरीसाठी विकले जाताहेत, सत्ताधाऱ्यांशी सेटींग, अजित पवार यांचाच आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्याच्या दु:खातून अजित पवार अद्यापही सावरले नाहीत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपाला विरोध करत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. आता तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी चिरीमिरीसाठी विकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.NCP office bearers are being sold for money, setting with the ruling party, Ajit Pawar’s allegation


विशेष प्रतिनिधी 

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्याच्या दु:खातून अजित पवार अद्यापही सावरले नाहीत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपाला विरोध करत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. आता तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी चिरीमिरीसाठी विकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर कित्येक दिवस अजित पवार पिंपरी-चिंचवड परिसरात गेलेही नव्हते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आता पदाधिकाºयांना खडसावले आहे.पुण्यातील कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, पालिकेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमार्फत आमदारांकडून खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे.

मात्र, चिरीमिरीसाठी विकले गेल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमकपणे विरोध करीत नाहीत. तुम्ही सत्ताधाºयांसोबत सेटिंग करायला कुठे बसता हे मला माहिती आहे. परंतु, मी हे खपवून घेणार नाही, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी आक्रमक व्हावेच लागेल.

पवार म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना २५ लाखांच्या न झालेल्या मूर्ती घोटाळ्यावरून भाजपने पक्षाला बदनाम केले. राष्ट्रवादीची सत्ता घालवली. आता महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून कोट्यवधी रुपयांचे घोटाळे राजरोसपणे सुरू आहेत.

तरीही चिरीमिरीसाठी व सेटिंगसाठी कोणताही पदाधिकारी आक्रमकपणे बोलत नाही. स्थायी समिती व सभागृहात विरोध केला जात नाही. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांशी भाजपच्या आमदारांशी लागेबांधे व ठेकेदारीमध्ये भागीदारी आहे.

सेटिंग करण्यासाठी तुम्ही कुठे बसता याचीही मला माहिती मिळाली आहे. यापुढे मी खपवून घेणार नाही. यापुढे चिरीमिरी व सेटिंगमध्ये कोणी अडकल्यास त्यांची गय करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

NCP office bearers are being sold for money, setting with the ruling party, Ajit Pawar’s allegation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*