गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नसल्याने प्रवाशांची अडचण झाली होती. त्यांच्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी खुशखबर दिली आहे. पाच एप्रिलपासून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे. ७१ रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली.Good news for railway passengers, travel can be done without reservation from April 5, 71 trains will start
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नसल्याने प्रवाशांची अडचण झाली होती. त्यांच्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी खुशखबर दिली आहे. पाच एप्रिलपासून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे.
७१ रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली.रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अनारक्षित रेल्वेची यादी ट्विट केली आहे. प्रवाशांच्या सुविधेत वाढ करण्यासाठी ५ एप्रिलपासून ७१ अनारक्षित रेल्वे सेवा सुरू केली जातअसल्याचे त्यांनी सांगितले.
या रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता येईल असेही त्यांनी म्हटले आहे.रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार या अनारक्षित रेल्वेमध्ये उत्तर भारतातील वेगवेगळ्या भाकातील रेल्वेंचा यात समावेश आहे.
यामध्ये सहारनपूर – दिल्ली जंक्शन, फिरोजपूर कँट – लुधियाना, फजिल्का – लुधियाना, बठिंडा – लुधियाना, वाराणसी – प्रतापगड, सहारनपूर – नवी दिल्ली, जाखल – दिल्ली जंक्शन, गाझियाबाद – पानीपत, शाहजहाँपूर – सीतापूर, गाझियाबाद – मुरादाबाद यांसहीत अनेक शहरांसाठी या अनारक्षित रेल्वे चालणार आहेत.
पहिल्या टप्यात पाच एप्रिलपासून तर काही रेल्वे ६, १५, १६, १७ एप्रिलपासून सुरू होतील.महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मार्गांचा यामध्ये समावेश केलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App