रेल्वे देशाची आणि नागरिकांची संपत्ती, खासगीकरण होणार नाही, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे ठाम प्रतिपादन

भारतीय रेल्वे ही देशाची आणि देशातील नागरिकांची संपत्ती आहे.भारतीय रेल्वेचं कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण केलं जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन रेल्वे मंत्री आणि भाजप नेते पीयूष गोयल यांनी केले आहे.Railway Minister Piyush Goyal asserts that there will be no privatization of the country’s wealth and the wealth of its citizens


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : भारतीय रेल्वे ही देशाची आणि देशातील नागरिकांची संपत्ती आहे.भारतीय रेल्वेचं कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण केलं जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन रेल्वे मंत्री आणि भाजप नेते पीयूष गोयल यांनी केले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या पार्श्वभूमीवर खडगपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलताना गोयल म्हणाले, मी तुम्हाला विश्वास देतो की भारतीय रेल्वे ही देश आणि देशातील नागरिकांची संपत्ती आहे.त्याला कुणीही हात लावू शकणार नाही आणि रेल्वेचं कधीही खासगीकरण होणार नाही. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका. ही तुमची संपत्ती आहे आणि तुमचीच राहील.

यापूर्वीही संसदेत बोलताना पियुष गोयल यांनी रेल्वेचे खासगीकरण होणार नाह असे आश्वासन दिले होते. ते म्हणाले होते, अनेक खासदार रेल्वेच्या खासगीकरणाचा आणि कॉपोर्रेटायजेशनचा आरोप करत आहेत.

पण भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार नाही आणि रेल्वे भारत सरकारच्या ताब्यातच राहील. आगामी काळात रेल्वे अपारंपरिक उर्जेवर धावेल. २०२३ पर्यंत रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण केले जाईल. जास्तीत जास्त रेल्वे स्थानकं आंतरराष्ट्रीय दजार्ची करण्यात येतील, असे गोयल यांनी सांगितले होते.

Railway Minister Piyush Goyal asserts that there will be no privatization of the country’s wealth and the wealth of its citizens

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*