Bollywood Actor Akshay Kumar corona positive, quarantined at home

अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाइन होऊन घेतोय उपचार

Akshay Kumar corona positive : कोरोनाच्या संसर्गाने देशात पुन्हा एकदा हाहाकार करायला सुरुवात केली आहे. बॉलीवूडही यातून सुटलेले नाही. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींना या महामारीनं गाठल्याचं पाहायला मिळालंय. आता बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता अक्षय कुमारदेखील कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. अक्षय कुमारने स्वत: ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. Bollywood Actor Akshay Kumar corona positive, quarantined at home


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाने देशात पुन्हा एकदा हाहाकार करायला सुरुवात केली आहे. बॉलीवूडही यातून सुटलेले नाही. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींना या महामारीनं गाठल्याचं पाहायला मिळालंय. आता बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता अक्षय कुमारदेखील कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. अक्षय कुमारने स्वत: ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अक्षय कुमारला कोरोनाची लागण

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्याने स्वत:च आपल्या सोशल हँडल्सवर पोस्ट केली आहे. अक्षयने लिहिले की, ‘मला सर्वांना सांगायचे आहे की आज सकाळी माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करून, मी तत्काळ स्वत:ला विलग केले आहे. मी घरी विलगीकरणात राहत आहे. सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार घेत आहे.’

यापूर्वी, बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना आणि त्यांच्या कुटुंबातील काही जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. याचबरोबर अनेक हिरोईन्सनाही कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे. ऑक्टोबरनंतर ओसरायला लागलेला कोरोना आता पुन्हा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. देशाच्या विविध भागांत दररोज विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त चिंतेचे वातावरण आहे. येथील रुग्णसंख्या देशाच्या एकूण आकडेवारीच्या तुलनेत सर्वात जास्त आहे.

Bollywood Actor Akshay Kumar corona positive, quarantined at home

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*