‘मधुकुंज : ६० हजार चौ. फूट एरिया, D Mart च्या दमानींना भुरळ पाडणारा १००१ कोटींचा आलिशान ‘ सपनोंका मकान ‘


फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत (Forbes India’s rich list of 2020) दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय आहेत.


या बंगल्याला ओपन टेरेस आणि विस्तीर्ण मोकळा भाग आहे. शिवगिरी, रामटेक, मेघदूत यासारखे व्हीआयपी बंगलेही याच परिसरात आहेत. Dmart Radhakishan Damani Madhukunj Bungalow


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शून्यातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे डि मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी मुंबईत तब्बल 1001 कोटी रुपयांचं घर विकत घेतलं आहे. Dmart Founder Radhakishan Damani who bought Madhukunj Bungalow at Malbar Hill costliest real estate deals in Mumbai

दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू मलबार हिल्समध्ये नारायण दाभोळकर मार्गावर हा आलिशान बंगला आहे. ‘मधुकुंज’ नावाचा हा बंगला दीड एकर जमिनीवर वसलेला आहे. तर 60 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त बिल्ट अप एरिया आहे. पाहूया हा आलिशान ‘ सपनोंका मकान ‘ .5752.22 चौरस मीटर क्षेत्रावर वसलेल्या ‘मधुकुंज’ बंगल्याची ग्राऊण्ड प्लस वन अर्थात एकमजली रचना आहे. हा बंगला 90 वर्षांहून अधिक जुना असल्याचा अंदाज बांधला जातो. नारायण दाभोळकर मार्गाच्या कोपऱ्यावर हा बंगला आहे. या बंगल्याला ओपन टेरेस आणि विस्तीर्ण मोकळा भाग आहे. शिवगिरी, रामटेक, मेघदूत यासारखे व्हीआयपी बंगलेही याच परिसरात आहेत.

मूळ मालक प्रेमचंद रॉयचंद

‘मधुकुंज’ बंगल्याचे मूळ मालक प्रेमचंद रॉयचंद यांचे कुटुंबीय आहेत. या व्यापारी कुटुंबानेच मुंबईला राजाबाई टॉवर भेट दिला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची स्थापना करणाऱ्या प्रेमचंद यांनी मातोश्री राजाबाईंचे नाव टॉवरला देण्याची अट घातली होती.

या घराचं बाजार मूल्य 724 कोटी रुपये आहे. त्यावरील विविध शुल्कासह घराची किमत 1 हजार कोटीच्या घरात जाते. दमानी यांनी गेल्या महिनात तीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी (3% दराने) भरली होती. या परिसरातील रहिवाशी संकुलात फ्लॅट्सची किंमत 70 ते 80 हजार प्रतिचौरस फुटाच्या घरात आहे. दमानींनी या बंगल्यासाठी 1.6 लाख प्रति चौरस फूट इतके मूल्य मोजल्याचे दिसते.

दमानी या वास्तूला रिडेव्हलप करुन टॉवर बांधणार का, हे अद्याप अस्पष्ट आहे. या भागातील बहुतांश जमीनधारकांनी प्लॉट खरेदी करुन गगनचुंबी रहिवाशी इमारती बांधल्या आहेत. दमानी रिअल इस्टेट क्षेत्रातील आपली व्याप्ती वाढवण्याचा अंदाज आहे.
नुकतंच त्यांनी ठाण्यात अडीचशे कोटी रुपयांना आठ एकर जमीन खरेदी केल्याचीही माहिती आहे.

Dmart Founder Radhakishan Damani who bought Madhukunj Bungalow at Malbar Hill costliest real estate deals in Mumbai

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात