ऐंशीव्या वर्षी शरद पवारांना का हवे मुंबई ग्रंथालयाचे अध्यक्षपद? पाच हजार कोटींच्या भूखंडासाठी? निवडणूक रणधुमाळीत आरोप


राज्याचे चारदा मुख्यमंत्री राहिलेले देशात तीनदा केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेले शरद पवार आता ऐंशी वर्षांचे होऊन गेले आहेत. या वयात ते एका ग्रंथालयाच्या अध्यक्ष पदासाठी का प्रयत्न करत आहेत? दादर भागातला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा पुनर्विकासानंतर पाच हजार कोटींचा बनणारा भूखंड याचे कारण असल्याची चर्चा आहे. Why Four time CM and three time Union minister Sharad Pawar is craving for president ship of a library?


प्रतिनिधी

मुंबई : “देशाचा माजी संरक्षणमंत्री सरळमार्गाने एका ग्रंथालयात अध्यक्ष होण्यासाठी धडपडत असेल तर मराठी अस्मितेचे बुडबुडे टरारून फुगले पाहिजेत. पण, याचसाठी झालेले निवडणुकीतले गैरप्रकार हे नवा इतिहास नोंदवणारे ठरणार आहेत,” असा आरोप सामाजिक क्षेत्रातून होत आहे.

वाटेल ते करून पद टिकवायचेच आणि त्यासाठी केलेले गैरप्रकार हा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या आजच्या निवडणूक प्रक्रियेतील सगळ्यात गंभीर मुद्दा आहे. देशातली राज्यघटना, लोकशाही मूल्य धोक्यात असं वक्तव्य सतत करणारे स्वतः निवडून यायला किती भयानक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया बाटवतात याची महाराष्ट्र आज नोंद ठेवेल, असे सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंदे आणि अनिल गलगली यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्ष पदासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यांच्या सह त्यांनी सुप्रिया सुळे, प्रताप आसबे या ‘राष्ट्रवादी’शी संबंधित लोकांनाही ग्रंथ संग्रहालयावर घेण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

या विरोधात शिंदे आणि गलगली यांनी आवाज उठवला आहे. ते म्हणतात, “एकशे तेवीस वर्ष जुन्या संस्थेचे आज मतदार ठरवले गेले आहेत फक्त ३४. सहा हजार मतदारांचा हक्कच गायब केला गेलाय. जे उमेदवार आहेत ते मतदार नाहीत. कमाल तर या बाबीची की, शरद पवारांचे नाव दोन मतदार याद्यांमध्ये असूनही त्यांचा अध्यक्षपदाचा अर्ज टिकून आहे. निवडणूक प्रक्रियेतील घोळ धर्मदाय आयुक्ताच्या लक्षात आणून दिल्यावर, ‘प्रक्रिया सुरू आहे म्हणून थांबवू शकत नाही’ असे म्हणत असतील तर, त्यांना काय म्हणावे?”



“मराठी समाजावर संस्कार करणाऱ्या या एकशे तेवीस वर्ष जुन्या संस्थेचे आजीव सभासद किमान एक लाख असायला हवे होते. ते आहेत फक्त काही हजार. त्यामुळे, गेली अनेक वर्षे पवार यांनी अध्यक्षपदावर बसून कधी या संस्थेच्या गुणात्मक सुधारणेसाठी प्रयत्न केले आहेत असे ऐकिवात नाही. उलट, संस्थेच्या पदावर घरातील माणसांना बसवायचे फर्मान काढल्याचे सांगितले जातेय. त्यामुळे, ते एका ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी का राहू इच्छितात याचं उत्तर कुठं शोधायचं? ते उत्तर ग्रंथालयाच्या भूखंडात असेल कदाचित. मुंबईच्या मध्यवर्ती दादर भागातला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा भूखंड पुनर्विकासानंतर पाच हजार कोटींचा बनेल. पद टिकवण्यासाठी यापेक्षा, अजून कुठलं कारण असू शकेल का?,” असेही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंदे आणि अनिल गलगली याविरोधात लढत आहेत. शिंदे यांनी तर पवारांसमोर अध्यक्षपदाचा अर्ज भरलाय आणि ते निवडणुकीत टिकून आहेत. हे दोघेही निवडणुकीतल्या गैरप्रकाराविरोधात यानंतरही लढणार आहेत. महा आघाडीचे पाळीव, तथाकथित ‘विचारजंत’ यावर चिडीचूप आहेत किंबहुना तसे अपेक्षित आहेच. पण, विशेष म्हणजे, ऐंशीव्या वर्षी एका ग्रंथालयाचे अध्यक्षपद काबूत ठेवायची पवारांची धडपड ही शिवसेनेला हाताशी धरून सुरू आहे. त्याच शिवसेनेला, जिच्या पक्षप्रमुखांना म्हणे गल्ली ते दिल्ली कुणाचा पक्षविस्तार आवडतच नाही. पण, ग्रंथालय अध्यक्षपदासाठीही आग्रही असणाऱ्या ऐंशी वयाच्या पवारांच्या पाठीशी उभे राहणे मात्र पसंत आहे, अशी मते सोशल मीडियात व्यक्त होत आहेत.

Why Four time CM and three time Union minister Sharad Pawar is craving for president ship of a library?

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात