विशेष प्रतिनिधी
परभणी: Sujat Ambedkar परभणीत कोंबिंग ऑपरेशन का केले याची सरकारने माहिती द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली आहे.Sujat Ambedkar
ते म्हणाले, संविधानाची तोडफोड करणे ही गंभीर घटना आहे. या देशातील कोणताही संविधान प्रेमी नागरिक हे कधीही सहन करणार नाही. एका संविधानशील मार्गाने आंदोलन होत असताना कोबिंग ऑपरेशन केले जाते ही गंभीर बाब आहे.कोंबिंग ऑपरेशन का करण्यात आले हे सरकारने आम्हाला सांगावे. जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. या घटनेत ज्या निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल केलेत ते मागे घेतले पाहिजे
दरम्यान, आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले, ज्या ज्या वेळी राज्यात भाजप सत्तेत येते, त्या त्या वेळी संविधान विरोधी गोष्टी घडतात.संविधान विटंबनाच्या गंभीर प्रकरणात कठोर कारवाई यावेळी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही करतोय. परभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबना च्या घटनास्थळाचा आम्ही आढावा घेतला. अद्यापही जिल्हा प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची सुरक्षा करण्यासाठी तात्काळ कर्मचारी नियुक्त करावेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App