‘तुम्ही सत्तेत असताना ‘वसुली की गॅरंटी‘ होती, हे…’ ; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

अडीच वर्षे सरकार असताना तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून शेपट्या हलवत होतात


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि ठाकर गटाच्या नेत्यांकडून वारंवार भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील महायुती सरकावर टीका केली जात आहे. ज्यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.When you were in power there was a vasuli guarantee this BJP targets Uddhav Thackeray

भाजपने म्हटले आहे की, ‘उबाठा…देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रत्येकवेळी तुमचे रुसवे फुगवे दूर करीत तुम्हाला सोबत घेतले. पण तुम्ही कायम त्यांच्या पाठीत खंजीर खुपसत राहिलात. हा सर्व प्रकार जनतेला माहीत आहे.’



याशिवाय, उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या मनोरुग्ण स्वभावाचे किस्से तुमच्याच पक्षातील आमदार कसे चघळत होते. ते सांगावेत का? ‘मोदी की गॅरंटी‘ ही जनतेच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही सत्तेत असताना ‘वसुली की गॅरंटी‘ होती, हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं.गँगवॅार सरकारमध्ये नाही तर तुमच्या उबाठा गटात सुरू आहे. उबाठा गटातील दोन लोकांनी गोळ्या घातल्या आणि गँगवॅार सुरू केलं. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडली आहे. असंही भाजपने म्हटलं आहे.

याचबरोबर अडीच वर्षे सरकार असताना तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून शेपट्या हलवत होतात. जनतेला सोडा साधं तुमच्या लोकांनाही भेटत नव्हता. आपल्याच पक्षातील नेत्यांना, आमदारांना मातोश्रीवर ताटकळत ठेवत होता. या सर्व घटना उभ्या महाराष्ट्रानं पहिल्या आहेत. त्यामुळे शेळपट लोकांनी फुकाच्या गप्पा मारू नयेत. उबाठा बरे व्हा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा! असंही म्हणत भाजपने टीका केली आहे.

When you were in power there was a vasuli guarantee this BJP targets Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात