उध्दव ठाकरे यांची घोटाळ्यांची लंका कधीही जळू शकते, किरीट सोमय्या यांचा आरोप

ठाकरे परिवार यांची बेनामी संपत्ती आता जप्त होत आहे, त्यामुळे त्याच्यातील अस्वस्थता दिसून येत आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्यांची लंका जळू शकते, असा थेट आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.Uddhav Thackeray’s scam scandal could burn anytime, alleges Kirit Somaiya


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे परिवार यांची बेनामी संपत्ती आता जप्त होत आहे, त्यामुळे त्याच्यातील अस्वस्थता दिसून येत आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्यांची लंका जळू शकते, असा थेट आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

आता आमचे पुढील टार्गेट आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले. त्यासाठी दिल्लीतील मोठ्या नेत्यासोबत मी चर्चा केली असल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे आमचे पुढील टार्गेट आहे. उद्धव ठाकरे यांचे साले यांच्या आणखी एका बेनामी संपत्तीची माहिती दिल्लीतील वरिष्ठांना दिली आहे. त्याचा पाठपुरावा करणार आहे. श्रीधर पटवर्धन यांच्या बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आदित्य आणि तेजस यांच्या कंपनीत पैसा आला. आदित्य आणि तेजस यांच्या कंपन्यांची चौकशी करणार आहे.



उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत मार्फत माझ्यावर भ्रष्ट्राचारचे आरोप केले. मात्र, त्यांच्याकडे एकही कागद नाही. जर हिम्मत असेल तर कागद घेऊन संजय राऊत यांना पोलिसांकडे पाठवा, असे आव्हान त्यांनी दिले. यामुळेच त्यांना आम्ही कायदेशीर कारवाईची नोटीस दिली असल्याचा दावा देखील त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ‘डरपोक’ आहेत, त्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, असा आरोपही त्यांनी केला. 57 कोटींचा आरोप केला मात्र 57 पैशांचा कागदही दाखवू शकले नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray’s scam scandal could burn anytime, alleges Kirit Somaiya

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात