भाजपच्या “बी टीम” वरून मोठ्ठी माशी शिंकली; प्रकाश आंबेडकर – तुषार गांधी यांच्यात राजकीय लढाई जुंपली!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपच्या “बी टीम” वरून मोठ्ठी माशी शिंकली; प्रकाश आंबेडकर आणि तुषार गांधी यांच्यात राजकीय लढाई जुंपली!!Tushar Gandhi and prakash ambedkar lock horns over the issue of BJP’s B team!!

त्याचे झाले असे :

आपला मोदी विरोध प्रखर करत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन जनतेला केले. पण तसे आवाहन करताना ते तेवढ्यापुरतेच थांबले नाहीत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला भाजपची “बी टीम” म्हटले. प्रकाश आंबेडकर आणि एआयएमआयएम यांच्या भूमिका भाजपच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत. आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मत दिले, तर त्याचा फायदा भाजपला होईल, त्यामुळे वंचितला मतदान करण्याऐवजी थेट महाविकास आघाडीला मतदान करा, असे तुषार गांधी म्हणाले.



तुषार गांधींच्या या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर चिडले. तुषार गांधींच्या पणजोबांचे राजकारण सर्वसमावेशक होते, पण तुषार गांधींनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आणि कोणताही आधार नसलेले आहे. वंचित बहुजनांच्या राजकारणाला अडथळा निर्माण करणारे आहे, असे प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, की तुषार गांधींच्या पणजोबांनी म्हणजे महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्धचा लढा सर्वसमावेश केला होता. त्यांनी त्या लढाईत सर्वांना सामावून घेतले होते. पण तुषार गांधींचे राजकारण तसे सर्वसमावेशक नाही. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीची कसा राजकीय व्यवहार केला, त्यांनी वंचित बहुजन आघाडी पासून किती अलिप्त धोरण स्वीकारले, त्यांचे भाजपशी 20 जागांवर फिक्सिंग आहे, याची तुषार गांधींना बिलकुल माहिती नाही, अशा परखड शब्दांमध्ये प्रकाश आंबेडकरांनी तुषार गांधींची कानउघडणी केली.

जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निराधार आरोप करण्यात आणि निरर्थक गोष्टी बोलण्यात काय मतलब आहे??, असा खोचक सवालही प्रकाश आंबेडकरांनी केला. एकूण भाजपची खरी “बी टीम” कोण??, या मुद्द्यावर महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजांमध्येच राजकीय लढाई जुंपल्याचे सगळ्या महाराष्ट्राला दिसले.

Tushar Gandhi and prakash ambedkar lock horns over the issue of BJP’s B team!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात