लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, १९ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

Notification issued for the third phase of Lok Sabha elections applications can be made till April 19

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण ९४ जागांसाठी मतदान होणार आहे Notification issued for the third phase of Lok Sabha elections applications can be made till April 19

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला आता एक आठवडा उरला आहे. पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने शुक्रवारी तिसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली. यासह तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी प्रक्रियाही सुरू झाली आहे. यावेळेसही लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला आणि दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे.नामांकन प्रक्रिया १९ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे

शुक्रवारी, १२ एप्रिल २०२४ रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी नामांकन सुरू झाले. या टप्प्यासाठी नामांकनाची अंतिम तारीख १९ एप्रिल २०२४ आहे. उमेदवार सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. तर २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर २२ एप्रिल रोजी उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण ९४ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील १० जागांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील ज्या दहा जागांवर तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे त्यात एटा, हाथरस, आग्रा, फतेहपूर सिक्री, फिरोजाबाद, मैनपूर, संभल, आमला, बदाऊन आणि बरेली या जागांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होतील.

Notification issued for the third phase of Lok Sabha elections applications can be made till April 19

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात