विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मंगळवारी राज्यामध्ये एकूण 2172 नवीन कोरोणा बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1098 रुग्ण कोरोणा मुक्तदेखील झालेले आहेत.
Today 2172 new corona cases have been reported in the maharashtra state
देशातील सर्वात जास्त ओमायक्रॉन बाधित रुग्णदेखील महाराष्ट्रामध्येच आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 4 हजार 831 पेशन्टनी कोरोणावर मात केलेली आहे. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्त्याण्णव 97.65 टक्के इतके आहे. राज्यात आज एकही ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे.
Corona Vaccine : कोरोनाविरुद्ध युद्धात भारताच्या भात्यात आणखी दोन लसी, आरोग्य मंत्रालयाची कोव्होव्हॅक्स आणि कोर्बेव्हॅक्सला मंजुरी
राज्यात नोंद झालेल्या एकूण 167 ओमायक्रॉन बाधितांच्या रुग्णांपैकी 91 रुग्ण ओमायक्रॉन मुक्त झालेले आहेत.
राज्यात सध्या एकूण 1 लाख 11 हजार 232 व्यक्ती होम क्वारंटाइन मध्ये आहेत. तर 910 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये आहेत. आज एकूण 21 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोणाच्या एकूण 6358 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. तर एकूण 293 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशात ओमायक्रॉनचे एकूण 653 रुग्ण आढळले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App