जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी साई मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणेबाबत शिर्डीत बैठक आयोजित केली होती. या दरम्यान प्रवेशासाठी नियमांत फेरबदल केले आहेत.These are the new rules for Sai Darshan in Shirdi
विशेष प्रतिनिधी
शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शिर्डीतील साईबाबा मंदिरात आता ऑनलाईन पासधारकांनाच दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचा निर्णय साई संस्थानाने घेतला आहे.
साईतील शिर्डी मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी आता भक्तांना ऑनलाईन नोंदणी करावी लागले. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना एक पास जारी करण्यात येईल. हा पास जवळ असेल, तर मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी साई मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणेबाबत शिर्डीत बैठक आयोजित केली होती. या दरम्यान प्रवेशासाठी नियमांत फेरबदल केले आहेत. त्यामध्ये कोरोना काळात शिर्डीत गर्दी होऊ नये यासाठी आता साई भक्तांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आदेश दिले आहेत.
१)१५ हजार भक्तांनाच केवळ ऑनलाइन दर्शन पास २)शिर्डीत येताना ऑनलाइन दर्शन आणि आरती बुकिंग करूनच यावे लागणार आहे. ३)sai.org.in या संस्थानच्या वेबसाईटवर मिळणार ऑनलाईन पास मिळणार आहे. ४) दहा हजार भाविकांना मोफत तर पाच हजार भाविकांना सशुल्क ऑनलाईन पास मिळणार आहे. ५)साई प्रसादालय बंद असतील. ६)शिर्डीतील रेस्टॉरंट आणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय रात्री ८.३० नंतर बंद राहणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App