गांधीनगर महापालिकेत भाजपला तब्बल दहा वर्षांनंतर बहुमत


विशेष प्रतिनिधी

गांधीनगर – गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४४ पैकी ४० जागांवर विजय मिळविला आहे. गांधीनगर महापालिकेत भाजपला दहा वर्षांनंतर बहुमत मिळाले आहे. त्यामुळे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी येथे जल्लोष केला.BJP gets majority in Gandhinager Carporation

काँग्रेसला तीन जागांवर समाधान मानावे लागले. आम आदमी पक्षाने एक जागा मिळवत खाते उघडले आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्यासमोर गांधीनगर महापालिकेत बहुमत आणण्याचे लक्ष्य होते.



सुमारे ९० टक्के जागा मिळवून ते आपल्या पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.गांधीनगर महापालिकेसाठी तीन ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. सुमारे ५६ टक्के मतदारांनी यासाठी मतदान केले होते.

BJP gets majority in Gandhinager Carporation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात