पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांचे गांधीनगर महापालिका निवडणुकीत मतदान


वृत्तसंस्था

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर महापालिका निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. रायसन गावातील मतदान केंद्रावर जाऊन हीराबेन यांनी मतदान केले. Gujarat: Heeraben Modi, the mother of PM Narendra Modi, casts vote in Gandhinagar Municipal Corporation (GMC) elections at a polling centre in Raysan village in the city

हिराबेन या सध्या शंभरीत आहेत. त्यांची बुद्धी तल्लख असून आजही त्या स्वतंत्रपणे आपली कामे करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर वाढदिवशी त्यांच्या भेटीला घरी जात असतात. मोदींच्या आईने मतदान केल्यामुळे गांधीनगर महापालिका निवडणुकीला एक वेगळे ग्लॅमर प्राप्त झाले आहे.

या आधी अहमदाबाद महापालिका निवडणुकीत मोदींच्या पुतणीने तिकीट मागितले होते. परंतु भाजपच्या स्क्रुटिनी कमिटीने ते नाकारले होते. त्यावेळी त्यांनी बंडखोरी केली नाही, याचीही बातमी झाली होती. गांधीनगर महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळी दहा वाजेपर्यंत 11 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Gujarat: Heeraben Modi, the mother of PM Narendra Modi, casts vote in Gandhinagar Municipal Corporation (GMC) elections at a polling centre in Raysan village in the city

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर