Wadettiwar : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट,राज्य सरकारने यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवून कृती आराखडा बनवावा, वडेट्टीवार यांची मागणी

Wadettiwar

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Wadettiwar ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा आणि आरक्षणाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या मागणीमुळे केंद्र सरकारला ओबीसी जनगणनेबाबत भूमिका घ्यावी लागली, मात्र जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम नाही यामुळे त्यांच्या हक्कांवर गदा येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.Wadettiwar

ओबीसींच्या विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यासाठी बैठक होणार असून राज्यभर आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.Wadettiwar

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. धरणांमधील घटता पाणीसाठा, मराठवाड्यासह अनेक भागांतील दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून आपला कृती आराखडा जाहीर करावा,अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.Wadettiwar



पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास राज्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने वेळ वाया न घालवता ठोस नियोजन आणि उपाययोजना कराव्यात अस वडेट्टीवा म्हणाले.

देशात विरोधी पक्ष संपवण्याचे आणि एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही संस्थांवर दबाव आणून विरोधी पक्ष कमकुवत करण्याचे राजकारण सुरू असून याबाबत देशातील जनतेने सतर्क राहण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील राजकारण सतत बदलत असते. पक्षात येण्या-जाण्याची प्रक्रिया सुरू राहते, मात्र कोणताही पक्ष किंवा विचार सहजपणे संपवता येत नाही. ठाकरे आपल्या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी निश्चितपणे प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार आणि कायदा-सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. नागपूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करत या सर्व प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा गटनेता बदलण्यात आला,यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणले, गटनेता निवडीचे काम पक्षाच्या पत्रानुसार होत असते. पक्षाला जो निर्णय घ्यायचा आहे,तो पक्षश्रेष्ठी घेतील. याबाबत काही अधिक बोलायचं नाही अशी भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली.

Maharashtra faces the looming threat of drought; Wadettiwar demands that the state government convene an all-party meeting to formulate an action plan.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात