मग शरद पवार, रोहित पवारांवरही कारवाई करा, खासदार सुजय विखे-पाटील यांची मागणी


रमेडेसिवीर इंजेक्शन वाटणे गुन्हा असेल तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावरही कारवाई करावी, असे नगरचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी म्हटले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत आपल्यालाही प्रतिवादी करावे, असा अर्ज नगरचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने करण्यात आला आहे.Then take action against Sharad Pawar and Rohit Pawar, demand of MP Sujay Vikhe-Patil


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रमेडेसिवीर इंजेक्शन वाटणे गुन्हा असेल तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावरही कारवाई करावी, असे नगरचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत आपल्यालाही प्रतिवादी करावे, असा अर्ज नगरचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने करण्यात आला आहे.विखे-पाटील यांनी म्हटले आहे की, आपण १७०० इंजेक्शन चंदीगड येथे खरेदी करून शिर्डीला आणले. जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात विखे यांनी इंजेक्शनसाठी परवानगी दिली होती, मात्र ती चंदीगडहून आणल्याचे माहिती नसल्याचे म्हटले आहे.

यावर पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार असून डॉ. विखे यांना प्रतिवादी करून घ्यायचे किंवा नाही, यावरही त्याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे. तर याचिकाकर्त्यांनी दुरूस्ती अर्ज सादर करून अशा पद्धतीने इंजेक्शन आणणाऱ्या अन्य नेत्यांवरही कारवाईची मागणी केली आहे.

नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनीही आज दुरूस्ती अर्ज सादर केला.

वृत्तपत्रांत आलेल्या बातमीच्या आधारे राज्यात ठिकठिकाणी राजकीय लोकांनी रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याचे आढळून येत असल्याचे म्हटले आहे. माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, आमदार अमरीश पटेल यांनी कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना इंजेक्शनचे वाटप केल्याचे दिसून येते.

त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारी अधिकारी खोटी कागदपत्रे तयार करीत असून त्यामध्ये तफावत आढळून येत असल्याचेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ५ मे रोजी ठेवण्यात आली आहे.

यामध्ये डॉ. विखे यांनी आणून वाटलेल्या इंजेक्शनबद्दल तक्रार असली तरी डॉ. विखे यांना प्रतिवादी न करता सरकारला प्रतिवादी करण्यात आले होते. मागील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने जिल्हाधिकारी विखे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निरीक्षण नोंदविले होते.

शिर्डी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज जतन करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. विखे यांच्यावतीनेही आपल्याला प्रतिवादी करून आपले म्हणने ऐकून घ्यावे, असा अर्ज सादर करण्यात आला.

आपण १७०० इंजेक्शनचा साठा नियमाप्रमाणे खरेदी केला व त्यातील १२०० इंजेक्शन चंदीगड येथून शिडीर्ला खाजगी विमानाने आणल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या अर्जावर पाच मे रोजी निर्णय होणार आहे.

नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्रात म्हटले आहे की, विखे पाटील हॉस्पिटलला १७ रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार आणलेल्या इंजेक्शनची नोंद जिल्हा शल्यचिकित्सकांकडे करण्यात आलेली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी शिर्डी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजही सादर केले.

Then take action against Sharad Pawar and Rohit Pawar, demand of MP Sujay Vikhe-Patil

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात