कोण मंत्री कोठे फिरतोय मुख्यमंत्र्यांनाच कळेना, सुजय विखे-पाटील यांची टीका


चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यात वाढतोय. पण तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे येथे कोणाचा मंत्री कुठे फिरतोय आणि काय निर्णय देतोय, हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नसते, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

नगर : चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यात वाढतोय. पण तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे येथे कोणाचा मंत्री कुठे फिरतोय आणि काय निर्णय देतोय, हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नसते,अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

नगर जिल्हाधिकारी कार्यालयात चीनी व्हायरसच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विखे-पाटील म्हणाले, राज्य सरकारकडे सध्या पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते रोज एक नवा नियम काढत आहेत.

राज्याचे सचिव वेगळा नियम काढतात. मुख्यमंत्री वेगळा जीआर काढतात. महसूलमंत्री वेगळाच जीआर काढतात. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी एवढचं काय तर गावचे सरपंच सुद्धा वेगळाच नियम काढत आहेत. मंत्री लॉक झाले आणि जनता अनलॉक झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण कुठे चालले, याचा कोणालाच काही पत्ता नाही.

नगर जिल्ह्याला केंद्राच्या निधीतून ५० व्हेंटिलेटर मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून राज्यातील रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे, पीपीई कीट, मास्क दिले जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारला थेट आर्थिक साह्य करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती