प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सहाव्या जागेची रस्सीखेच वाढली असून आधीचे राष्ट्रपती नियुक्त खासदार आणि सध्याचे अपक्ष उमेदवार छत्रपती संभाजीराजे यांच्यासाठी मराठा मोर्चा आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या 9 अपक्ष आमदारांना वर्षावर बोलवले आहे. The rope for Sambhaji Raje grew !!; Maratha front aggressive; 9 independent MLAs per year
– प्रियांका चतुर्वेदी चालतात, मग संभाजीराजे का नाही चालत??
परप्रांतीय प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेना उमेदवारी देऊ शकते, तर छत्रपती संभाजीराजे यांना अटी – शर्ती घालून उमेदवारी का दिली जाते?? त्यांना उलट सर्व पक्षांनी बिनविरोध निवडून दिले पाहिजे, अशी भूमिका मराठा मोर्चाने घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संभाजीराजे यांना उमेदवारी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्याच वेळी सर्व पक्षांच्या मराठा आमदारांना भेट घेण्याचा मराठा मोर्चा मच्या समन्वयकांचा विचार आहे.
– मुख्यमंत्र्यांचे मौन, संजय राऊतांचे वक्तव्य
मुख्यमंत्र्यांनी जशी संभाजीराजे यांच्याशी वर्षा बंगल्यावर चर्चा केली होती, तशीच चर्चा ते अपक्ष आमदारांची करत आहेत. भाजपने तिसरा उमेदवार मैदानात उतरला तर त्याच्याशी मुकाबला कसा करायचा??, याची आखणी केली जात आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेना पक्ष प्रवेशाची घातलेली अट यावर अद्याप स्वतः मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत, पण संजय राऊत यांनी मात्र एक वेगळे वक्तव्य करून या प्रकरणाला ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपतींच्या घराण्याविषयी आदर, पण…
छत्रपतींच्या घराण्याविषयी शिवसेनेला आदर आहे संभाजीराजे निवडून यावेत असे शिवसेनेचेही मत आहे. परंतु, निवडणुकीचे गणित वेगळे असते .संभाजीराजे यांना कोणती अट नाही. पण त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवली तर शिवसेनेचे बळ वाढेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. यातून शिवसेना आपल्या आधीच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या नेत्यांनी मराठा आमदारांची भेट घेणे याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
– मराठा आमदार किती प्रतिसाद देतात??
सर्वपक्षीय मराठा आमदार मराठा मोर्चाच्या आवाहनाला किती प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण एकूण संभाजीराजे यांच्यासाठी राज्यसभेची सहावी जागा ही मोठ्या राजकीय रस्सीखेचीचे कारण ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App