महाराष्ट्राची प्रगती ही सरकारची नव्हे तर उद्योगपती आणि लोकांची देन; उद्योगपती अभय फिरोदियांचे परखड बोल!!


प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र 1960 मध्ये औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य नव्हते. पण इथल्या उद्योगपतींनी आणि लोकांनी भरपूर प्रयत्न करून महाराष्ट्राला औद्योगिक आघाडीवर प्रगतीशील राज्य बनवले. ही इथल्या सरकारांची देन नसून उद्योगपती आणि लोकांची देन आहे. या प्रगतीचा मी साक्षीदार आहे, असे परखड बोल ज्येष्ठ उद्योगपती आणि फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना सुनावले आहेत. त्याचबरोबर मोदी राजमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार बदलतो आहे. भविष्यकाळात महाराष्ट्राला या दोन राज्यांची स्पर्धा करावी लागेल, असे भाकीतही अभय फिरोदिया यांनी वर्तवले आहे.
Maharashtra’s progress is not due to the government but to the industrialists and the people

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा पदवीप्रदान समारंभ झाला. राजनाथ सिंह यांचेही यामध्ये भाषण झाले, पण उद्योगपती अभय फिरोदिया यांनी सरकारची डोळ्यात अंजन घालणारी जी परखड चिकित्सा केली, त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

– लादेन आणि अब्दुल कलाम

कोट्याधीश घरात जन्माला आलेला एखादा लादेन बनतो, तर लहानपणी जगण्यासाठी पेपर टाकणारा एक मुलगा पुढे जाऊन ए. पी. जे. अब्दुल कलाम बनतो, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. अल कायदातही सुशिक्षित तरुण आहेत आणि इन्फोसिसमध्ये देखील सुशिक्षित तरुण आहेत. तुमच्यावरचे संस्कार तुम्ही कोण होणार हे ठरवतो, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

राजनाथसिंह म्हणाले, “करोना आपत्तीनंतर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व आणि या क्षेत्राबद्दलचा जगभरातील आदर वाढला आहे. आरोग्य, निरोगीपणा याला आपल्या संस्कृतीत प्राधान्य देण्यात आले आहे. शरीरासोबतच मन:स्वास्थ्य देखील महत्त्वाचे आहे. पदवी घेतल्यानंतर तुम्ही देशात, जगात काम कराल तेव्हा तुमच्या मनाची व्यापकता ठरवेल की तुम्ही लोकांना काय देणार?”

– महाराष्ट्रातल्या प्रगतीची देन सरकारची नव्हे, तर लोकांची!!

डॉ. अभय फिरोदिया म्हणाले, की सन १९६० मध्ये महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर नव्हता. गेल्या ६० वर्षात महाराष्ट्राची जी काही प्रगती झाली ती सरकारची देन नसून येथील लोक, उद्योजकांच्या प्रयत्नांची देन आहे. १९३१ मध्ये उत्तर प्रदेशचा जीडीपी देशात सर्वाधिक होता. १९६७ मध्ये बिहार राज्य गव्हर्नन्समध्ये देशात आघाडीवर होते. मग आता हे सगळे का बिघडले?, याचा विचार करावा. पण आता”मोदी राज”मध्ये हा प्रवाह बदलतो आहे.

– औद्योगिक प्रगतीचा साक्षीदार

आता उत्तर प्रदेशातली कायदा सुव्यवस्था सुधारत आहे. बिहारही बदलतो आहे. उद्योग, रोजगार निर्मितीत ही राज्ये सुधारतील तेव्हा महाराष्ट्राला याच मोठ्या राज्यांशी खरी स्पर्धा करावी लागेल. देशाच्या औद्योगिक प्रगतीचा मी साक्षीदार आहे. देशात पूर्वी काही नव्हते, तेथे आता ब्लॉक चेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे नवी तंत्रज्ञानं येत आहे. या दृष्टीने विद्यापीठांना तयार राहावे लागेल, असेही अभय फिरोदिया यांनी आवर्जून नमूद केले.

Maharashtra’s progress is not due to the government but to the industrialists and the people

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात