संभाजीराजे महाविकास आघाडी कडून अर्ज भरण्यास इच्छुक, पण मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेचा आग्रह!!; निर्णय नंतर


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातले राज्यसभा निवडणुकीचे वारे वर्षा बंगल्यावर पोचले. ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे माजी खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे. पण त्यांच्या या भूमिकेनंतर शिवसेनेने त्यांची कोंडी केली. यानंतर आता संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यास सांगितले. पण संभाजीराजे यांनी यास नकार दिला असून, आपण महाविकास आघाडीकडून अर्ज भरण्यास इच्छुक असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. Sambhaji Raje is willing to fill the application from Mahavikas Aghadi



– संभाजीराजे यांनी घेतली भेट

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी संध्याकाळी भेट घेऊन चर्चा केली. सुमारे 25 मिनिटे चाललेल्या या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्यापुढे शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव ठेवला. पण या प्रस्तावात बदल करण्यास संभाजीराजे यांनी सुचविले. शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीकडून हा अर्ज भरण्यास आपण इच्छुक असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे.

या प्रस्तावावर विचार करुन काही दिवसांत आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना सांगितले असल्याचेही सूत्रांकडून समजते.

सध्या संभाजीराजे यांना राष्ट्रवादीने आपली जादा मते देऊ असे आश्वासन दिले आहे. याच मतांवर सध्या तरी त्यांचा भरोसा आहे. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसने आपली भूमिका सध्या आधांतरी ठेवली आहे.

Sambhaji Raje is willing to fill the application from Mahavikas Aghadi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात