आसाममध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारकडे साकडं घातलं आहे.The Maharashtra government will bring the children trapped in Assam safely, informed Dilip Walse Patil
विशेष प्रतिनिधी
पुणे:भारतीय सैन्यात नोकरी मिळवण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थी हे आसाममध्ये अडकल्याची घटना घडली.या सर्व विद्यार्थ्यांना आसाममध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.या मुलांच्या जेवणाची देखील सोय आसामच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही.
आसाममध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारकडे साकडं घातलं आहे.दरम्यान आसाममधे अडकलेल्या मुलांशी काल संपर्क झाला आहे.जे करोना पॉझिटिव्ह आहेत.त्यांना प्रवास करायला बंधने आहेत,जे पॉझिटिव्ह नाहीत ते प्रवास करु शकतात त्यांना सांगण्यात आल आहे
की,त्यांनी काळजी करु नका.तसेच महाराष्ट्र सरकार आसाम सरकार बरोबर संपर्क करेल आणि या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणेल. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App