ठाकरे + पवारांच्या पक्षांची इतरांसारखीच वाताहत होईल; प्रकाश आंबेडकरांचे भाकीत

विशेष प्रतिनिधी

अकोला : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विषय संपला आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वतःमध्ये बदल केले नाहीत, तर त्यांच्या पक्षांची ही इतरांसारखीच वाताहत होईल, असे राजकीय भाकित प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले आहे. Thackeray + Pawar’s parties will suffer like others

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण नेहमीच स्वार्थ केंद्रित राहिले, पण आताचा जमाना तशा राजकारणाचा नाही. त्यामुळे ठाकरे आणि पवारांनी आपल्या स्वतःमध्ये काळानुरूप बदल केले नाहीत, तर त्यांच्या पक्षाची ही इतरांसारखीच वातहत होईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लोकशाही आणि उमेदवारांचे सामाजिकीकरण करण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीने विविध समाज घटकांमधल्या कार्यकर्त्यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या जातीवादाला चाप बसू शकेल. समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विषय संपुष्टात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये आमुलाग्र बदल होतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपले स्वार्थ केंद्रित राजकारण बदलून स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही, तर त्या दोघांच्याही पक्षांचे इतर राजकीय पक्षांसारखीच वाताहात होईल, असे भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवले.

Thackeray + Pawar’s parties will suffer like others

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात