वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्र पेट्रोल – डिझेल वरील मूल्यवर्धित कर कमी करण्या ऐवजी महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने इंपोर्टेड दारूवरील उत्पादन शुल्कात 50 टक्क्यांची घट करून दाखविली. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने सरकारला घेरले आहे.Thackeray – Pawar government’s only agenda; Pubs, parties and pegs; BJP MLA Ashish Shelar’s Tikastra
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सरकारला टोला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचा एकच अजेंडा आहे. पब, पार्टी आणि पेग यापेक्षा त्यांना दुसरे काही दिसत नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरच्या उत्पादन शुल्कात कमी करून सर्व ग्राहकांना पाच ते दहा रुपयांचा दिलासा दिला. 21 राज्यांनी आपापल्या राज्यांमधल्या मूल्यवर्धित करात सवलत दिली. त्यामुळे त्या राज्यांमध्ये पेट्रोल – डिझेल स्वस्त झाले, पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल – डिझेलच्या मूल्यवर्धित करात कपात केलीच नाही. उलट इंपोर्टेड दारूच्या उत्पादन शुल्कात 50 टक्क्यांची कपात करून दारू स्वस्त केली. पब, पार्टी आणि पेग एवढाच या सरकारचा अजेंडा आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
“करून दाखविले”
महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारने पेट्रोल – डिझेल नव्हे, पण इंपोर्टेड दारूवरील उत्पादन शुल्क 50 टक्क्यांनी घटविले आहे.केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव उत्पादन शुल्क घटवून कमी गेले. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांनी त्यावरचा मूल्यवर्धित कर घटवलेला नाही. त्यामुळे तिथे पेट्रोल डिझेलचे भाव पुरेसे कमी झालेले नाहीत.
This Govt is running on the agenda of pub, party and peg: BJP MLA Ashish Shelar on Maharashtra Govt reducing excise duty on imported foreign liquor by 50% pic.twitter.com/VcwMU6O4cc — ANI (@ANI) November 21, 2021
This Govt is running on the agenda of pub, party and peg: BJP MLA Ashish Shelar on Maharashtra Govt reducing excise duty on imported foreign liquor by 50% pic.twitter.com/VcwMU6O4cc
— ANI (@ANI) November 21, 2021
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इम्पोर्टेड दारूवरील आयात शुल्कात 50 टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे स्कॉच व्हिस्की ह्या सारखी दारू 35 ते 40 टक्के स्वस्त होईल अशी माहिती दारू उत्पादक आणि विक्रेता संघटनेने दिली आहे. महाराष्ट्राचे आयात दारूच्या उत्पादनातून साधारण दोनशे कोटींचे उत्पन्न मिळते.
परंतु गेल्या तीन वर्षांमध्ये हे उत्पन्न घटून शंभर कोटींवर आले आहे. यामध्ये कोरोना काळाचाही समावेश आहे. आयात दारू खूप महाग असल्याने काही प्रमाणात कमी झाले होते. त्याचा आयातीवर ही परिणाम झाला होता, अशी माहिती संघटनेने दिली आहे.
मात्र आता महाविकास आघाडी सरकारने इम्पोर्टेड दारूच्या उत्पादन शुल्कात 50 टक्के घट केल्याने प्रत्यक्षात त्या दारूच्या किमती मध्ये 35 ते 40 टक्क्यांची घट होईल आणि कदाचित दारूचे सेवन वाढेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल वरचे उत्पादन शुल्क कमी करून पाच ते दहा रुपयांची सवलत सर्व देशभर दिली. राज्य सरकारांनी पेट्रोल-डिझेल वरचा मूल्यवर्धित कर कमी करावा, असे आवाहन देखील केले. परंतु महाराष्ट्राच्या महाविकास सरकारने अद्याप तो निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये अजूनही पेट्रोलचे भाव हे शंभरी पारच आहेत. या पार्श्वभूमीवर इम्पोर्टेड दारूच्या उत्पादन शुल्कात 50 टक्क्यांची घट करणे या निर्णयाकडे पहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App