INS Visakhapatnam : स्वदेशी युद्धनौका! भारतीय नौदलात INS विशाखापट्टणम दाखल! बराक-ब्रह्मोस मिसाइलने सुसज्ज


  • INS विशाखापट्टणमची (INS Visakhapatnam) लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7400 टन आहे. त्याचा कमाल वेग 55.56 किलोमीटर प्रति तास आहे. INS विशाखापट्टणमला चार वेगवेगळ्या गॅस टर्बाइन इंजिनमधून शक्ती मिळते. 

 


  • अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर्स आणि सेन्सरने सुसज्ज.

विशेष प्रतिनिधी 

मुंबई:भारतीय नौदलात आणखी एक सामर्थ्यवान जहाज दाखल झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहिले स्‍वदेशी गाइडेड मिसाइल डिस्‍ट्रॉयर जहाज ‘P15B’ INS विशाखापट्टणम मुंबईत नौदलाला सुपूर्द केले.INS VISAKHAPATNAM

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी आयएनएस विशाखापट्टणम सेनेकडे सुपूर्द केले आणि ते म्हणाले, ‘आज आमच्याकडे स्वदेशी उत्पादनात देशाला पुढे नेण्याची चांगली संधी आहे.

संरक्षण क्षेत्रासाठी सरकारकडून विविध सवलती दिल्या जात आहेत. यशाचा हा वेग कायम राखणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. भारतीय नौदलाच्या या पहिल्या PB15 स्टेल्थ गाईडेड मिसाईल नाशक युद्धनौकेमध्ये भारताची सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामध्ये ब्रह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.

स्वदेशी युद्धनौका नौदलासाठी मैलाचा दगड आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानला कडवी टक्कर मिळणार आहे. या युद्धनौकेत अतिशय शक्तिशाली क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रेही बसवण्यात आली आहेत.नौदलाने ट्वीट करून माहिती दिली होती की, मुंबईतील माझगाव डॉक येथे तयार केलेले पहिले स्वदेशी बनावटीचे गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर जहाज P15B ‘विशाखापट्टणम’ 28 ऑक्टोबर रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले होते.

जानेवारी 2011 च्या करारानुसार INS विशाखापट्टणमची निर्मिती करण्यात आली आहे. नौदलाला 3 वर्षांच्या विलंबानंतर हे जहाज मिळाले आहे. याशिवाय आणखी तीन विनाशकारी जहाजे बांधली जाणार आहेत. या चौघांची एकूण किंमत सुमारे 35,000 कोटी रुपये आहे.

स्वदेशी गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर त्याच्या डेकमधूनच विमानविरोधी क्षेपणास्त्र डागू शकतो. याच्या मदतीने शत्रूची विमाने आणि त्यांची क्षेपणास्त्रे काही सेकंदात नष्ट केली जाऊ शकतात. यामध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र, बराक क्षेपणास्त्र प्रणालीसह इतर अनेक सेन्सर्स आणि शस्त्रे बसवता येतील.

INS VISAKHAPATNAM

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*