TCS corporate Jihad : माजी खासदार इम्तियाज जलील निदा खान आणि तिच्या कुटुंबाच्या भेटीला; तरीही फरार निदा पोलिसांना सापडेना!!

TCS corporate Jihad

– मालेगावात धर्मांतराचे रॅकेट, निदा खानच्या सुनावणी दरम्यान तपासात धक्कादायक वास्तव समोर!!


विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली, त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून ती तिच्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडली. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.TCS corporate Jihad: Former MP Imtiaz Jalil meets Nida Khan and her family; Still, the police cannot find the absconding Nida!!

– इम्तियाज जलील – निदा खान भेट

मात्र फरार असलेल्या निदा खान आणि तिच्या कुटुंबाच्या भेटीला माजी खासदार इम्तियाज जलील पोहोचले होते. त्यांनी निदा खान हिचे समर्थन केले. तिच्यावरचे आरोप खोडून काढले. तिच्या कुटुंबीयांना दिलासा दिला. ही माहिती त्यांनीच पत्रकारांना दिली. पण फरार निदा खान हिला महाराष्ट्राचे पोलीस अद्याप शोधू शकले नाहीत.



– मालेगावात धर्मांतराचे रॅकेट

मालेगावातील एक टीम धर्मांतरासंबंधी सर्व कागदपत्रे तयार करून निदा खान हिला आणि तिच्या टीमला देत होती. त्यातूनच धर्मांतराचे मोठे रॅकेट चालवले जात होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिल्याची माहिती या प्रकरणातले वकील अजय मिश्रा यांनी दिली.

अजय मिश्रा म्हणाले, “आजची सुनावणी केवळ निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जापुरतीच मर्यादित होती. न्यायालयाने दानिश आणि निदा खान यांच्या कारवायांची वैयक्तिकरित्या तपासणी केली. तपासात सध्या केवळ एवढेच उघडकीस आले आहे, की मालेगावमध्ये एक टीम आहे, जिने धर्मांतरासाठी कागदपत्रे तयार केली. तपास प्राथमिक टप्प्यात आहे. यामध्ये मूलतः हिंदू धर्माच्या श्रद्धांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करून तक्रारदारांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. हे आरोप जबरदस्तीचे आणि शारीरिक होते, आरोपीने लग्नाच्या नावाखाली हे सर्व घडवून आणले आहे. त्या संदर्भात आणखी काही गोष्टी सर्व तपासादरम्यान उघड होतील.”

TCS corporate Jihad: Former MP Imtiaz Jalil meets Nida Khan and her family; Still, the police cannot find the absconding Nida!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात