बारामतीत 10 महिने मुक्काम ठोकून नुसतेच भागत नाय; जुन्या वैऱ्यांकडेही करावी लागतेय धावाधाव!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : बारामतीत 10 महिने मुक्काम ठोकून नुसतेच भागत नाय, तर जुन्या वैऱ्यांकडेही करावी लागतेय धावाधाव!!, अशी अवस्था शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे झाली आहे. Supriya Sule visited anantrao and sangram thoptes house in bhor

अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेल्यानंतर सुप्रिया सुळे यांची बारामतीतली सीट त्यांनी धोक्यात आणली. तशी सीट धोक्यात आणण्याशिवाय अजित पवारांना पर्यायही उरला नाही. पण मग आपली सीट वाचवण्यासाठी सुप्रिया सुळेंनाही धडपड करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यामुळेच त्यांनी पुढचे 10 महिने म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत बारामतीत मुक्काम करायचे ठरवले. पण बारामतीत नुसताच 10 मुक्काम ठोकून भागणार नाही, तर निवडणूक जिंकायची असेल तर पवार घराण्याच्या जुन्या राजकीय वैऱ्यांचेही उंबरे झिजवावे लागतील याची जाणीव सुप्रिया सुळेंना झाली आणि त्या भोरमध्ये अनंतराव थोपटे आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहोचल्या.

सुप्रिया सुळेंचा भोरमध्ये विद्या प्रतिष्ठानचा सायकल वाटप आणि अन्य उपक्रम होता. त्या निमित्ताने त्यांचा भोर दौरा झाला. पण या भोर दौऱ्यातच त्यांनी अनंतराव थोपटे आणि संग्राम थोपटे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्यात लोकसभा निवडणूक विषयी चर्चा झाल्याची बातमी माध्यमांनी दिली, पण पाच वर्षात एकमेकांची तोंडेही न बघणाऱ्या आणि संधी मिळेल तिथे एकमेकांना टीका करून ठोकणाऱ्या नेत्यांनी आपापसात भेट घेतल्यामुळे तो भोर तालुक्याबरोबरच महाराष्ट्रातल्या चर्चेचा विषय ठरला.


विधानसभा अध्यक्षपदासाठी खलबते, सोनिया गांधी यांचा ठाकरे यांना फोन; संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा


पवार – थोपटे यांचे जुने राजकीय वैर

पवार आणि थोपटे यांच्यातले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण पवारांना तसे कधी यश मिळाले नाही कारण भोर मध्ये सर्वात मोठा अडथळा थोपटे ठरले. पवारांनी अनेक निवडणुकांमध्ये जंग जंग पछाडले पण 2004 ची निवडणूक वगळता एकही निवडणुकीत अनंतराव थोपटेंना आसमान दाखवणे पवारांना शक्य झाले नाही.

पण पवारांचे आणि थोपटेंचे राजकीय वैरी त्याहीपेक्षा जुने आहे. कारण अनंतराव थोपटे हे पवारांनी पाठीत खंजीर खुपसलेल्या वसंतदादा पाटलांचे कट्टर समर्थक नेते राहिले. त्यांनी कधीच काँग्रेस पक्ष सोडला नाही 2004 चा अपवाद वगळता अनंतराव थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघ कायम स्वतःकडे किंवा स्वतःच्या मुलाकडे राखण्यात यश मिळवले.

आता अजित पवारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर केवळ पुणे जिल्ह्यातल्या वर्चस्वाचा मुद्दा शिल्लक राहिला नाही, तर आता थेट सुप्रिया सुळे यांची बारामतीची सीट धोक्यात आली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी बारामतीत 10 महिने मुक्काम ठोकण्याबरोबरच पवार खानदानाच्या जुन्या राजकीय वैऱ्यांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे. यातूनच त्यांनी अनंतराव थोपटे आणि संग्राम थोपटे यांची भेट घेऊन त्यांच्याशी लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा केल्याची बातमी आहे.

Supriya Sule visited anantrao and sangram thoptes house in bhor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात