विशेष प्रतिनिधी
मुंबई : धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून मारणाऱ्या पापी औरंग्याच्या कबरीला उखडून फेकण्याची हिंदुत्ववाद्यांनी तयारी चालवली असताना शरद पवारांचे आमदार नातू औरंगजेबाच्या कबरीच्या समर्थनार्थ बाहेर आले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांचे समर्थन केले. औरंगजेबाची कबर हे एक प्रतीक आहे, अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी कबर उखडून फेकण्याला विरोध दाखवला आहे. त्या पाठोपाठ शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील औरंगजेबाच्या कबरीचे बौद्धिक समर्थन केले. या देशात प्रत्येकाची आस्था वेगवेगळी आहे. त्या आस्थांचे जतन झाले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आम्हाला औरंगजेबाची कबर उखडून फेकायची आहे, पण काँग्रेसच्या राजवटीत त्या कबरीला आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने कायदेशीर संरक्षण दिले. त्यामुळे कायद्यानुसार तरी सध्या राज्य सरकारला तसे करता येत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाच्या कबरीची “बाबरी मशिद” करू, असे म्हणून तिथे कारसेवा करायचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर एसआरपीएफने औरंगजेबाच्या कबरीला सध्या संरक्षण दिले आहे. पण शरद पवारांचे नातू आणि त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मात्र औरंगजेबाच्या कबरीच्या समर्थनार्थ समोर आलेत. औरंगजेबाला महाराष्ट्रात राहूनही इथे राज्य करता आले नाही याचे ती कबर म्हणजे प्रतीक आहे. त्यामुळे ती उखडून फेकू नये, अशी मखलाशी करत रोहित पवारांनी औरंगजेबाच्या कबरीचे समर्थन केले. त्यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी देखील औरंगजेबाच्या कबरीचे समर्थन केले. भारतात प्रत्येकाची आस्था वेगवेगळी आहे. त्यामुळे सगळ्या आस्थांचे जतन केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App