बारामतीतून काढलेला “एस्केप रूट” वर्ध्यातून लोकसभेऐवजी मावळात पोहोचला नाही म्हणजे मिळवली!!


नाशिक : बारामतीतून काढलेला “एस्केप रूट” वर्ध्यातून लोकसभेऐवजी मावळात पोहोचला नाही, म्हणजे मिळवली!!, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल, पण ते विचित्र नाही, तर राजकीय वस्तुस्थितीला धरून आहे. कारण शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विदर्भातल्या वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पक्षाने संधी दिली तर आपण वर्ध्यातून लढू, असे काल त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.Supriya sule may contest from wardha loksabha constituency, but may loose like parth pawar in maval loksabha constituency!!

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचे माध्यमे अनेक अर्थ काढीत आहेत. यातला माध्यमांनी काढलेला पवारनिष्ठ पॉझिटिव्ह अर्थ असा, की पवार कुटुंब राष्ट्रवादीतील फुटीच्या निमित्ताने स्वतःचे राजकीय एक्सपॅन्शन करून घेत आहे. बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या, तर त्यांच्याविरुद्ध सामना देणे कठीण पडेल. त्याऐवजी स्वतःहून आपण बारामतीतून बाजूला होऊन अन्य मतदारसंघ शोधावा असा “सुज्ञ” विचार सुप्रिया सुळे यांनी केल्याचे बोलले जाते. म्हणजे एकाच वेळी बारामतीतून सुनेत्रा पवार आणि त्याच वेळी सुप्रिया सुळे या दोघी खासदार होऊ शकतील, असा त्यामागचा होरा आहे.

तसेही बारामतीतून अजित पवार आमदार आहेत आणि रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार आहेत. म्हणजे पवार फॅमिलीने विधानसभेत एक्सपॅन्शन केले आहेच. मग तसेच फॅमिली पॉलिटिकल एक्सपॅन्शन लोकसभेतही का करू नये??, असा विचार पवार परिवाराने केलेला असू शकतो, असे बोलले जाते. पण हा झाला माध्यमा माध्यमांनी केलेला पवारनिष्ठ पॉझिटिव्ह विचार!!

प्रत्यक्षात फॅमिलीच्या पॉलिटिकल एक्सपॅन्शनचे पवारांनी कितीही मनसुबे आखले असले तरी महाराष्ट्रातल्या मतदारांनी त्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे का??, याचा आढावा घेतला, तर वेगळेच वास्तव समोर येते. ते म्हणजे 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये पवारांच्या फॅमिली पॉलिटिकल एक्सपॅन्शनचा प्रयत्न फसलाच होता. कारण मावळात पार्थ पवारांचा पराभव झाला होता.

त्याचबरोबर स्वतः शरद पवारांनी मोदी लाटेचा एकूण परिणाम लक्षात घेता वेळेतच माढा लोकसभा मतदारसंघातून “एस्केप रूट” काढून राज्यसभा गाठली होती. आपण लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत कधीच पराभूत झालेलो नाही हे या “एस्केप रूट” मधून पवारांना दाखविता आले, पण त्याचवेळी फॅमिली पॉलिटिकल एक्सपॅन्शनचा प्रयत्न रोहित पवारांपुरताच मर्यादित राहिला, ही देखील वस्तुस्थिती आहे!!


सुप्रिया सुळे यांच्या भाषणात मोदींची स्तुती; सुषमा स्वराज, अरुण जेटलींचाही गौरव!!; त्यामुळे “इंडिया” आघाडीत संशयाचे मळभ!!


मग आता जेव्हा सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघ ऐवजी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मनसुबा व्यक्त करतात, त्यावेळी तो फॅमिली पॉलिटिकल एक्सपॅन्शनपेक्षा बारामतीतून काढलेला एस्केप रूट जास्त वाटतो. *तसेही कदाचित बारामतीतून अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार उभा राहिल्या, तर त्यांच्या विरोधात शरदनिष्ठ राष्ट्रवादी उमेदवार देईलही. कारण तो उमेदवार तृप्ती देसाई यांच्या रूपाने कदाचित आधीच ठरविला आहे. काही महिन्यांपूर्वी तृप्ती देसाईंनी बारामतीत घराणेशाहीचा खासदार नको, अशी भूमिका घेत लोकसभा निवडणूक लढविण्याचा इरादा दाखविलाच होता. त्यात त्यांनी आपल्याला कोणत्याही पक्षांनी उमेदवारी दिली, तर आपण उभे राहू असेही सांगितले होते. म्हणजे त्यांनी शिवसेना-भाजप यांच्याबरोबर राष्ट्रवादीचाही ऑप्शन ओपन ठेवलाच होता.

त्यावेळी देखील सुप्रिया सुळे यांचा “एस्केप रूट” आहे, हेच मी नमूद केले होते. आता सुप्रिया बारामती ऐवजी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या मनसुबा व्यक्त केल्याने त्यातले राजकीय इंगित बाहेर आले आहे.*

पण सुप्रिया सुळेंनी बारामतीतून काढलेला “एस्केप रूट” म्हणजे मराठीत पळ लोकसभेत पोहोचण्याऐवजी मावळात पोहोचला नाही म्हणजे मिळवली!! असे म्हणण्याची देखील वेळ येऊ शकते. मावळात पार्थ पवारांचा पराभव होऊ शकतो तर वर्ध्यातून सुप्रिया सुळे यांचाही पराभव होऊच शकतो. कारण वर्ध्यातून भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची चिन्हे आहेत. एक तर विदर्भ भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यात सुप्रिया सुळे या आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच स्वतंत्रपणे विदर्भाचा दौरा करीत आहेत. त्यात त्यांनी एकाच वेळी प्रफुल्ल पटेल आणि भाजपशी पंगा घेतला आहे. म्हणजे विदर्भाचा पहिलाच स्वतंत्र दौरा आणि त्यात वर्धा लोकसभेवर स्वारी ही राजकीय दृष्ट्या धाडसाची गोष्ट वाटली आणि माध्यमांनी लिहिली, तरी लोकसभा निवडणूक एवढी सोपी नाही.

पवार फॅमिलीच्या पॉलिटिकल एक्सपॅन्शन साठी काँग्रेसही विदर्भात कितपत मदत करेल??, याविषयी शंकाच आहे. कारण सुप्रिया सुळे यांना एकदा का वर्ध्यातून खासदार झाल्या, तर पुढच्या किमान तीन टर्म तरी त्या तिथून पडणार नाहीत आणि काँग्रेससाठी फार मोठे अडचणीची बाब ठरू शकते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा राजकीय वृक्ष येथे लावण्यापूर्वीच उखडणे हे भाजप पेक्षा काँग्रेससाठी अधिक गरजेचे आहे. तशीही पवार फॅमिलीच्या पॉलिटिकल एक्सपॅन्शनची जबाबदारी ही काँग्रेसची नाहीच. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा बारामतीतला “एस्केप रूट” कदाचित यशस्वी होईलही, पण तो “एस्केप रूट” लोकसभेत पोहोचेलच याची कोणतीही गॅरंटी नाही. त्याऐवजी तो मावळात पोहोचला नाही म्हणजे मिळवली!!, असे म्हणायची वेळ येण्याचीच दाट शक्यता आहे.

Supriya sule may contest from wardha loksabha constituency, but may loose like parth pawar in maval loksabha constituency!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात