विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एरवी केंद्रातल्या मोदी सरकारवर प्रत्येक विषयात शरसंधान साधणाऱ्या शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जुन्या संसदेतल्या अखेरच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणाची स्तुती केली. त्याचवेळी त्यांनी सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या दोन्ही नेत्यांचाही गौरवपूर्ण उल्लेख केला. Modi’s praise in Supriya Sule’s speech
जुन्या संसदेच्या कामकाजाचा आज अखेरचा दिवस आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसमावेशी भाषण केले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत प्रत्येक पंतप्रधानाचे नाव घेत त्यांनी त्यांचे योगदान अधोरेखित केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उचलून धरला.
#WATCH …मैं आज प्रधानमंत्री के भाषण की सराहना करती हूं जहां उन्होंने सराहना की कि शासन निरंतरता है। इस देश के निर्माण में पिछले 7 दशकों में विभिन्न लोगों ने योगदान दिया है, जिसे हम सभी समान रूप से प्यार करते हैं। चाहे आप इसे इंडिया कहें या भारत, यह आपका अपना देश है। हम सभी यहीं… pic.twitter.com/wGjCwjyfkH — ANI_HindiNews (@AHindinews) September 18, 2023
#WATCH …मैं आज प्रधानमंत्री के भाषण की सराहना करती हूं जहां उन्होंने सराहना की कि शासन निरंतरता है। इस देश के निर्माण में पिछले 7 दशकों में विभिन्न लोगों ने योगदान दिया है, जिसे हम सभी समान रूप से प्यार करते हैं। चाहे आप इसे इंडिया कहें या भारत, यह आपका अपना देश है। हम सभी यहीं… pic.twitter.com/wGjCwjyfkH
— ANI_HindiNews (@AHindinews) September 18, 2023
पंतप्रधान मोदींचे आजचे भाषण मला आवडले. कारण त्यांनी गेल्या सात दशकातल्या निरंतर चालणाऱ्या शासन प्रक्रियेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या देशाच्या विकासात अनेक लोकांचे योगदान असल्याचे त्यांनी मान्य केले. हा देश आपल्या सर्वांचा आहे. याला तुम्ही भारत म्हणा अथवा इंडिया म्हणा, डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या राज्यघटनेत केंद्र आणि राज्य सरकारांना विशिष्ट स्थान आणि अधिकार दिले आहेत. ते अधिकार घटनादत्त आहेत. भाजपच्या नेत्यांनी ज्या दोन नेत्यांचा उल्लेख केला नाही, त्यांचा उल्लेख मला करावासा वाटतो, ते म्हणजे सुषमा स्वराज आणि अरुण जेटली. या दोन्ही नेत्यांनी कायमच संघराज्य व्यवस्थेला महत्त्व दिले. त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर ती फूट अद्याप शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मान्य केलेली नाही. सुप्रिया सुळे संसदेतल्या भाषणात नेहमीच मोदी सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर शरसंधान साधत असतात.
सुप्रियांचे भाषण, पवारांविषयी संशय
पण आज मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची स्तुती करण्याबरोबरच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचाही गौरव पूर्ण उल्लेख केल्याने “इंडिया” आघाडीतल्या बाकांवर अस्वस्थता निर्माण झाली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भविष्यातल्या राजकीय भूमिकेविषयी “इंडिया” आघाडीत दाट संशय पसरला.
संसदेच्या विशेष अधिवेशनानंतर शरद पवारांच्या भूमिकेत बदल होऊन ते “इंडिया” आघाडी सोडून जातील की आघाडीत राहूनच “आतून” काही वेगळी भूमिका घेतील, याविषयी संशय वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App