एखाद्या चित्रपटाची दुसऱ्या रविवारी होणारी कमाई त्याचे लाईफटाईम कलेक्शन किती चांगले असेल हे ठरवत असते.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘जवान’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. दुसऱ्या आठवड्यातच या चित्रपटाने तब्बल ८०० कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असे जरी असले तरीही बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता सनी देओलच्या गदर -2 या चित्रपटाचा रेकॉर्ड मात्र शाहरुखच्या जवान चित्रपटास मोडता आलेला नाही. Jawaan made a huge collection in the second week but still could not break the record of Gadar 2
सुपरस्टार शाहरुख खान यावर्षी सिनेप्रेमींना सतत आनंद देत आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याने बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट ठाण’ दिला. आता शाहरुख त्याचा नवा चित्रपट ‘जवान’ घेऊन ‘पठाण’ला मागे टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला त्याचा चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत आहे.
दुसऱ्या शुक्रवारी शाहरुखच्या चित्रपटाचे 19 कोटींचे नेट कलेक्शन होते. पण शनिवारी चित्रपटाने 65% च्या मोठी उसळी मारून दहाव्या दिवशी सुमारे 32 कोटींची कमाई केली. आता ‘जवान’ने शनिवारच्या तुलनेत रविवारी अधिक कमाई केल्याचे ट्रेड रिपोर्ट्स सांगतात. दुसऱ्या रविवारी या चित्रपटाने 35 ते 37 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडमध्ये ‘जवान’ने भारतात 86 कोटी रुपयांहून अधिक नेट कलेक्शन केले आहे. शाहरुखच्या चित्रपटाने सलग दुसऱ्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम राखला आहे.
एखाद्या चित्रपटाची दुसऱ्या रविवारी होणारी कमाई त्याचे लाईफटाईम कलेक्शन किती चांगले असेल हे ठरवते. दुसऱ्या रविवारी सनी देओलच्या ‘गदर 2’चे सर्वात मोठे कलेक्शन आहे. ‘गदर 2’ ने या दिवशी 39 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. यानंतर येतो ‘बाहुबली 2’ ज्याने दुसऱ्या रविवारी 34.5 कोटी रुपये कमावले होते. तर ‘जवान’ने दुसऱ्या रविवारी केलेल्या कलेक्शनमध्ये हिंदी व्हर्जनची कमाई 34-35 कोटी रुपये आहे. म्हणजे या बाबतीत ‘जवान’ ला गदर -2 चा रेकॉर्ड मोडता आलेला नाही.
हिंदी चित्रपटांमध्ये दुसऱ्या वीकेंडची सर्वात मोठी कमाईही ‘गदर 2’च्या नावावर आहे. सनीच्या या चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये 90 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. तर ‘बाहुबली 2’ च्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या वीकेंडमध्ये जवळपास 81 कोटींची कमाई केली होती. ‘जवान’चे दुसरे वीकेंड कलेक्शन या दोघांमध्ये असणार आहे. अंतिम आकडेवारीत दुसऱ्या वीकेंडला ‘जवान’चे हिंदी व्हर्जनचे कलेक्शन 83 कोटींच्या आसपास पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App