प्रतिनिधी
चंद्रपूर : जुन्याच सरकारांचे कंत्राटी नोकर भरतीचे धोरण शिंदे – फडणवीस सरकार राबवत असले, तरी त्या धोरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. अजितदादा तुम्ही स्वतःचाच पक्ष फोडलात, पण कंत्राटी नोकर भरतीवरून महाराष्ट्रातल्या तरुणांशी तरी खोटं बोलू नका, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना सुनावले.You have broken your own party, now do not lie even on contract recruitment; Vadettivar’s attack on Ajitdad
९ खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन नोकर भरती करण्याता निर्णय घेत राज्य शासनाने तसा अध्यादेश काढला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला इशारा दिला. हे नालायक सरकार राज्यातील तरुणाई उद्धवस्त करायला निघालंय. मुलांनो रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जोपर्यंत हे सरकार अध्यादेश वापस घेत नाही तोपर्यंत मागे हटू नका, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केले. त्याचवेळी अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला. स्वतःला मोठा नेता म्हणून घेत असाल तर हे पाप तुम्ही करू नका. अजित पवार खोटं बोलून तरुणांना फसवत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पदभरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यांच्या या स्पष्टीकरणावर विजय वडेट्टीवारांनी तीव्र आक्षेप नोंदवत अजितदादांना आरसा दाखविला.
पक्ष फोडलात, आता हे पाप करू नका…
स्वतःला मोठा नेता म्हणाविणारे अजित पवार खोटं बोलून तरुणांची फसवणूक करीत आहेत. अजित पवारांवर माझा हा थेट आरोप आहे. दिशाभूल करणारे वक्तव्य करू नका. महाराष्ट्रातील तरुणांना फसवू नका. तुम्ही पक्ष फोडून गेलात, हा तुमचा विषय आहे. पण आता तरुणांना उद्धवस्त करण्याचे पाप तरी करू नका, अशा शब्दांत वडेट्टीवारांनी अजित पवार यांना सुनावलं.
*- केवळ 15 प्रवर्गासाठी निर्णय होता
६ सप्टेंबर २०२३ हा शासन अध्यादेश लागू झाला. हा निर्णय आधीच्या सरकारचा होता, असे हे सरकार सांगते. पण आमच्या वेळी हा निर्णय केवळ 15 प्रवर्गासाठी होता. त्यामध्ये डाटा ऑपरेटर संगणक चालक यांचा समावेश होता. सरकारने त्यामध्ये बदल करून शिपाई ते इंजिनियर या सर्वच पदांचा समावेश केला. 50000 वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 10000 रुपये थेट या कंपनीकडे जातील. उद्या ही कंपनी त्यांना 20000 हजार रुपये वेतनावर ठेवेल. त्यामुळे राज्यातील तरुणांचे भविष्य उद्धवस्त होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.*
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App